
Nashik News : पिंपळगाव बाजार समितीत शेतीमाल विक्री केलेल्या शेतकऱ्यांचे तब्बल पाच कोटी रुपये थकले आहे. संयम सुटलेल्या शेतकऱ्यांनी सोमवारी (ता. २३) बाजार समिती गाठत सभापती तथा आमदार दिलीप बनकर यांच्यापुढे आपली कैफियत मांडली. सभापती बनकर यांनी तत्काळ ‘अॅक्शन मोड’मध्ये येत संबंधित अडतदारांनी सव्वा महिन्याच्या आत शेतकऱ्यांची थकित रक्कम ३० जानेवारी २०२५ पर्यंत द्यावी; अन्यथा कारवाई करण्याचा इशारा दिला.
सरासरी ३०० ते ५०० रुपयांपर्यंत टोमॅटोच्या क्रेटला दर मिळाल्याने शेतकरी समाधानी होते. सर्वाधिक दर मिळत असलेल्या पिंपळगाव बाजार समितीत टोमॅटो विक्रीला यंदाही शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले.
पण, काही आडतदारांनी दोनशेहून अधिक शेतकऱ्यांचे सुमारे पाच कोटी रुपये थकविले आहेत. आडतदारांच्या दारात चकरा मारून वैतागलेल्या ८० ते ९० शेतकऱ्यांनी पिंपळगाव बाजार समितीच्या प्रशासकीय कार्यालयावर धडक देत संचालक मंडळापुढे व्यथा मांडल्या.
भारतीय किसान संघाच्या किसान पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचे नेतृत्व केले. रोख पेमेंटची अट असतानाही तीन महिने उलटूनही पैसे मिळत नसल्याचा तक्रारीचा पाढा शेतकऱ्यांनी वाचला. आठ दिवसांत थकित रक्कम न मिळल्यास ठिय्या आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला. त्या आशयाचे निवेदनही संचालक मंडळाला देण्यात आले.
शेतकरी शंकर दवंगे, प्रवीण मोरे, हर्षवर्धन किरकाडे, गणेश दवंगे, प्रकाश देशमुख, ज्ञानेश्वर शिंदे, भास्कर जाधव, साहेबराव आहेर, सीताराम घोरपडे, राजेंद्र जाधव, पंढरीनाथ गोतरणे, भारत निकम, संदीप बुनगे, सतीश भवर, राजेंद्र धनाईत आदी शेतकरी तसेच उपसभापती जगन कुटे, संचालक अनिल कदम, दिलीप मोरे, यतीन कदम, रामभाऊ माळोदे, गोकुळ गिते, राजेश पाटील, दीपक बोरस्ते, महेंद्र गांगुर्डे, ज्ञानेश्वर शिरसाठ, सोहनलाल भंडारी, शंकर ठक्कर, शिरीष गडाख आदी उपस्थित होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.