Tur Dal
Tur Dal Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Tur Market : खारपाणपट्ट्यातील तूरडाळ पोहोचली सातासमुद्रापार

Team Agrowon

Amravati News : नोकरीच्या निमित्ताने गाव आणि देश सुटला तरी या दोन्हींची ओढ कायम राहते. याच ओढीतून साता समुद्रापार अमेरिकेत राहणाऱ्या धर्मपाल कांबळे आणि संजय वाघमारे यांनी भारतीय शेतीमालाच्या आयातीवर भर दिला आहे. टाकरखेडा या छोट्याशा गावातून नैसर्गिक शेतीमाल मागवीत त्याचे वितरण ते अमेरिकेतील भारतीयांना करतात.

अकोला येथील रहिवासी धर्मपाल कांबळे व पवनार (वर्धा) येथील संजय वाघमारे हे गेल्या ३० वर्षांपासून हे नोकरीच्या निमित्ताने अमेरिकेत वास्तव्यास आहेत. मात्र त्यांनी अनेक वर्षांपासून भारतीय शेतीमाल मागवीत त्याचे वितरण इतर सहकारी सदस्यांमध्ये करण्यावर भर दिला आहे. टाकरखेडा संभू (अमरावती) येथील अभिजित देशमुख या शेतकऱ्याने अमरावती नॅचरल ब्रॅण्डखाली विविध शेतीमालाचे नैसर्गिक पद्धतीने उत्पादन व विक्रीवर भर दिला आहे.

त्याकरिता अमरावतीत आउटलेटही उघडण्यात आले आहे. त्याच्यासोबत मयूर ढेमरे हे देखील या क्षेत्रात काम करतात. मयूर हे मूळचे मंगरूळ दस्तगीर येथील रहिवासी असून, त्यांनी चिया सीडचे उत्पादन घेतले आहे. या दोघांच्या माध्यमातून सुमारे ७०० किलो तूरडाळ, सात किलो तूप वर्षभरात अमेरिकेला पाठविण्यात आले.

कोणत्याही अमरावती नॅचरल सोबत राज्यभरातील १२०० शेतकरी जुळलेले आहेत. त्यांच्याकडून त्या त्या भागातील वैशिष्ट्यपूर्ण आणि नैसर्गिक पद्धतीने उत्पादित शेतीमालाची खरेदी केली जाते. या वर्षी १३२ डझन आंबे दुबईला पाठविण्यात आले. जर्मनीला २२० डझन हापूस पाठविण्यात आला. पणन विभागाचे एक्‍स्पोर्ट सेंटर आहे वाशीला त्या ठिकाणी तपासण्याअंती फळ व भाजीपाला निर्यात केला जातो, असे अभिजित देशमुख यांनी सांगितले.

खारपाणपट्ट्यातील डाळीला विशिष्ट चव

टाकरखेडा संभू हे गाव खारपाणपट्ट्यात समावेशीत आहे. या भागात उत्पादित शेतीमालाला माती आणि पाण्याच्या गुणधर्मामुळे विशिष्ट चव राहते. त्यामुळे या भागातील शेतीमालाला मागणी देखील अधिक राहते. त्यासोबतच याची प्रक्रिया जात्यावर होत असल्याने ही पूर्णपणे नैसर्गिक राहते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Cultivation : सांगली जिल्ह्यात १ लाख ३७ हजार हेक्टरवर उसाची लागवड

Maharashtra Rain Update : पावसाचा जोर; पंचगंगा पात्रा बाहेर, मुंबईत एनडीआरएफची पथके तैनात

Jalgaon ZP : जळगाव जिल्हा परिषदेत दोन वर्षांपासून प्रशासकराज

Supriya Sule : राज्यासह केंद्रातील ट्रीपल इंजिन सरकार असंवेदनशील; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

Rain Update : खानदेशात काही भागांत जोरदार; अनेक मंडलांत तुरळक पाऊस

SCROLL FOR NEXT