Jowar Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Jowar Market : पंचवीस हजार क्विंटल ज्वारीची कमी दराने विक्री

Jowar Rate: शेतकऱ्यांच्या मालाला शाश्‍वत भाव देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, अशा लोकप्रिय घोषणा व्यासपीठांवरून नेहमीच मोठ्या आवाजात केल्या जातात.

 गोपाल हागे

Akola News : शेतकऱ्यांच्या मालाला शाश्‍वत भाव देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, अशा लोकप्रिय घोषणा व्यासपीठांवरून नेहमीच मोठ्या आवाजात केल्या जातात. परंतु खरेदीची वेळ आली की धोरणच वेळेत निश्‍चित केले जात नाही. यंदा ज्वारीच्या पिकाबाबतही असेच घडले असून या हंगामातील ज्वारीची बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात कमी दराने विक्री होत आहे.

हमीभावाच्या तुलनेत प्रतिक्विंटल किमान हजार रुपये दर कमी मिळत असल्याने एकट्या अकोला जिल्ह्यातील ज्वारी उत्पादकांचेच आतापर्यंत कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. राज्यभरात अशाच प्रकारची परिस्थिती बनलेली आहे.

शासनाने ज्वारीला (हायब्रीड) ३१८० व मालदांडी ज्वारीला ३२२५ रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर केलेला आहे. या भागात हायब्रीड ज्वारीचीच पेरणी अधिक होते. सध्या ज्वारी १८०० ते २३०० दरम्यान विकते आहे. बहुतांश माल हा दोन हजारांदरम्यान विकल्या जात आहे. अशा स्थितीत सध्याचे बाजारातील दर व हमीभाव यात किमान हजार रुपयांपर्यंत क्विंटलमागे तोटा सहन करावा लागतो आहे.

शासनाने हमीभावाने ज्वारीची खरेदी सुरू केली असती तर शेतकऱ्यांचा हा तोटा निश्‍चितच कमी झाला असता. जिल्ह्यात या हंगामात विविध बाजार समित्यांत आतापर्यंत सुमारे २५ हजार क्विंटलपेक्षा अधिक ज्वारीची खरेदी झालेली आहे. यात अकोट, अकोला या दोन बाजार समित्यांमध्येच सुमारे २० हजार क्विंटलपेक्षा जास्त ज्वारी विक्री झाली.

एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून तर आतापर्यंत जिल्ह्यात ११ हजार क्विंटलपर्यंत बाजार समित्यांत खरेदी-विक्री झाली. यावरून आवकेचा अंदाज स्पष्ट होतो. या ज्वारीचा दर २ हजारांपर्यंत होता.

२५ हजार क्विंटल ज्वारीला प्रतिक्विंटल १ हजार रुपये कमी मिळालेला दर लक्षात घेता जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सरळसरळ सुमारे अडीच कोटींचे नुकसान झालेले आहे. बाजार समित्यांशिवाय अनेक शेतकऱ्यांनी खेड्यांमधील व्यापाऱ्यांनाही हजारो क्विंटल ज्वारीची विक्री केलेली आहे. यामुळे हे नुकसान आणखी वाढते.

मे महिना सुरू झाला तरी ज्वारी खरेदीबाबत शासनस्तरावरून काहीही हालचाली झालेल्या नाही. पणन विभागाने शासनाकडे प्रस्ताव दिलेला असून, खरेदीबाबत हिरवी झेंडी मिळण्याची प्रतीक्षा केली जात आहे.

जिल्ह्यात ज्वारीची सर्वाधिक उलाढाल असलेल्या अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीने हमीभाव व बाजारातील दरात असलेली तफावत लक्षात घेता तातडीने हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी दोन ते तीन वेळा अधिकाऱ्यांना पत्रेही दिली. मात्र स्थानिक स्तरावर याबाबत काहीही निर्णय घेता येत नसल्याने गोची झालेली आहे. शासन निर्णय झालेला नसल्याने ना नोंदणी केली जात आहे ना खरेदी केंद्र सुरू झाले.

ज्वारीची उलाढाल वाढली--

अकोला जिल्ह्यात मागील हंगामात जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यामिळून सुमारे १८ हजार क्विंटल ज्वारीची आवक झाली होती. तर या हंगामात आतापर्यंत २५ हजार क्विंटल ज्वारीची आवक झालेली आहे. यावरुन शेतकऱ्यांचा ज्वारी पिकाकडे कल वाढलेला दिसून येतो.

अद्याप अनेक शेतकऱ्यांची ज्वारी विकायची शिल्लक आहे. तसेच उन्हाळी हंगामातील ज्वारीचे पीकसुद्धा अनेक ठिकाणी तयार झालेले नाही. हे पीक काढणीनंतर ज्वारीची आवक आणखी वाढू शकते. अशावेळी कमी दरामुळे शेतकऱ्यांचा होत असलेल्या तोट्यात भरच पडणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PDCC Bank: अतिवृष्टीग्रस्तांसाठी पीडीसीसी बँकेची १ कोटी २६ लाखांची मदत

Sugarcane Cultivation : नांदेड विभागात एक लाख ८१ हजार हेक्टरवर उसाची लागवड

Flood Livestock Loss : वाहून गेलेल्या पशुधनाला बाजारभावाप्रमाणे मदत द्या

Farmer Protest: कर्जमाफीशिवाय मागे हटणार नाही; २८ ऑक्टोबरला राज्यातील शेतकरी-मजूरांचा नागपूरात मोर्चा, बच्चू कडूंचा एल्गार

Diwali Clay Diyas : परराज्यातील पणत्यांची बाजारपेठांमध्ये आवक

SCROLL FOR NEXT