Edible Oil Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Import Edible Oil Price: डाॅलर महाग झाल्याने खाद्यतेलाचे भावही वाढले; सोयातेल, सूर्यफूल तेल, पामतेलाचे भाव किलोमागे ५ ते ६ रुपयाने वाढले

Essential Goods are Expensive: डाॅलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य घटल्याने आयात वस्तूंच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. खाद्यतेलाचे दर किलोमागे ५ ते ६ रुपयांनी वाढले असून, पामतेल, सोयातेल आणि सूर्यफूल तेल महागले आहे. तसेच आयात फळे आणि सुकामेव्याच्या किमतीही झपाट्याने वाढल्याने ग्राहकांना महागाईचा फटका बसत आहे.

Anil Jadhao 

Pune News: डाॅलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य कमी होत असल्याने आयात मालाचेही भाव वाढत आहेत. खाद्यतेलाचे भावही किलोमागे ५ ते ६ रुपयांपर्यंत वाढले आहेत. पामतेल, सोयातेल, सूर्यफुल तेल आणि सरकी तेलाचेही भाव वाढले आहेत. तसेच आयात फळे, भाजीपाला, सुकामेव्याचेही भाव वाढले आहेत.

घसरत्या रुपयामुळे देशात खाद्यतेल आणि आयात फळांच्या तसेच सुकामेव्याच्या किमती वाढत आहेत. डाॅलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य दिवसेंदिवस कमी होत आहे. एका डाॅलरसाठी आज (ता.१३) ८६.८८ रुपये मोजावे लागत आहे. रुपयाचे मूल्य कमी झाल्यामुळे आयात महाग झाली. कारण डाॅलरचे मूल्य वाढले. तर निर्यात स्वस्त झाली. कारण रुपया स्वस्त झाला. ही परिस्थिती देशाच्या निर्यातीसाठी चांगली असली तरी आयात माल महाग होत आहे. याचा चटके ग्राहकांना बसत आहेत.

भारत गरजेच्या जवळपास ६० टक्के खाद्यतेल आयात करतो. मागील १५ दिवसांमध्येच घसरत्या रुपयामुळे खाद्यतेलाचे भाव किलोमागे ५ ते ६ रुपयांनी वाढले आहेत. पामतेल १५ दिवसांपुर्वी १४० रुपये किलोने मिळत होते. ते आता १४६ रुपयाने मिळत आहे. सोयाबीन तेल १२८ रुपयांवरून १३५ रुपये किलोवर पोचले आहेत.

सूर्यफुल तेलाचे भावही ५ रुपयाने वाढून १५८ रुपये झाले. भूईमूग तेलाचे भाव २ रुपयाने वाढले असून १८५ रुपये झाले. सरकी तेल ६ रुपयाने महाग झाले. एक किलो सरकी तेल १३१ रुपयाने मिळत आहे. मोहरी तेलाचे भावही ३ रुपयाने वाढून १६६ रुपये झाले आहेत. खाद्यतेलाचे भाव वाढल्याने ग्राहकांना मात्र महागाईचे चटके बसत आहेत.

तसेच आयात होणाऱ्या किवी, अवोकॅडो, पिअर्स, प्रिमिअम सफरचंद, सुकामेव्याचे भाव वाढले आहेत. अवोकॅडोचे भाव जवळपास २२ टक्क्यांनी वाढले असून ४४० रुपयांवर पोचले आहेत. प्रिमिअम सफरचंदाचे भाव ८ ते १० टक्क्यांनी वाढले आहेत. तसेच किवी, अवोकॅडो, पिअर्स, बेरिजचे भावही १० ते १५ टक्क्यांनी वाढले आहेत. यापुढील काळात रुपयाचे मूल्य कमी झाल्यानंतर भाव आणखी कमी होण्याची शक्यता आहे, असे आयातदारांनी सांगितले.

डिसेंबर महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाचे भाव कमी झाल्यानंतर ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला होता. खाद्यतेलाचे भाव कमी झाले होते. मात्र रुपयाचे मूल्य कमी झाल्यानंतर पुन्हा एकदा महागाईची झळ बसत आहे. तसेच भारत आयातीवर अवलंबून असलेल्या फळे, भाजीपाला आणि सुकामेव्याचे भावही वाढल्याने ग्राहकांवर अतिरिक्त बोजा वाढत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT