tur rate
tur rate agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Tur Rate : तुरीच्या दरात वाढीचा कल

डॉ.अरूण कुलकर्णी

सोयाबीन (Soybean) व टोमॅटो (Tomato) वगळता सर्वच पिकांची आवक कमी होऊ लागली आहे. सोयाबीनमधील किमतींचा (Soybean Rate) कल उतरता असल्याने सोयाबीनचा साठा (Soybean Stock) आता बाजारात येऊ लागला आहे. आंध्र प्रदेश, तेलंगणा व कर्नाटक येथे टोमॅटोची आवक (Tomato Arrival) सर्वाधिक आहे. जुलै महिन्यात मका, मूग व तूर यांच्या किमती वाढत होत्या. कापूस, हरभरा, हळद, सोयाबीन, कांदा व टोमॅटो यांच्या किमतीचा कल उतरता होता.

८ ऑगस्ट पासून MCX मध्ये कापसाच्या ३१ ऑगस्ट २०२२ डिलिव्हरी व्यवहारांवरील मार्जिन ६ टक्क्यांवरून ११ टक्क्यांवर वाढवलेले आहे. त्याचबरोबर या व्यवहारांतील किमतींची मर्यादा २ टक्क्यांवर उतरवली आहे. हे बदल कापसाच्या पुढील डिलिव्हरी व्यवहारांसाठी नाहीत. (३१ ऑगस्ट नंतर MCX मधील पुढील करार ३१ ऑक्टोबर, ३० नोव्हेंबर, ३१ डिसेंबर व ३१ डिलिव्हरीसाठी आहेत). तुरीच्या साठ्यावरसुद्धा शासनाचे लक्ष आहे.

या सप्ताहातील किमतीतील चढ-उतार खालील प्रमाणे आहेत.

कापूस/कपाशी

MCX मधील कापसाचे व कपाशीचे राजकोटमधील स्पॉट भाव (रु. प्रति १७० किलोची गाठी) जुलै महिन्यात घसरत होते. या सप्ताहात कापसाचे स्पॉट भाव रु. ४४,८४० वर स्थिर आहेत. ऑक्टोबर डिलिव्हरी भाव ३.४ टक्क्यांनी वाढून रु. ३९,०३० वर आले आहेत. कपाशीचे स्पॉट भाव (प्रति २० किलो) रु १,६०० वर स्थिर आहेत. कापसाचे हमीभाव लांब धाग्यासाठी (प्रति क्विंटल) रु. ६,३८० व मध्यम धाग्यासाठी रु. ६,०८० आहेत.

मका

मक्याच्या स्पॉट (गुलाबबाग) किमती जुलै महिन्यात वाढत होत्या. या सप्ताहात स्पॉट किमती ६.४ टक्क्यांनी वाढून रु. २,५०० वर आल्या आहेत. फ्यूचर्स (सप्टेंबर डिलिव्हरी) किमतीसुद्धा ६.३ टक्क्यांनी वाढून रु. २,५१५ वर आल्या आहेत. नोव्हेंबर फ्यूचर्स किमती रु. २,५३८ वर आल्या आहेत. मक्याचा हमीभाव प्रति क्विंटल रु. १,९६२ आहे.

हळद

हळदीच्या स्पॉट (निजामाबाद) किमती जुलै महिन्यात घसरत होत्या. या सप्ताहात त्या २.६ टक्क्यांनी घसरून रु. ७,४९६ वर आल्या आहेत. सप्टेंबर फ्यूचर्स किमती २ टक्क्यांनी घसरून रु. ७,३२४ वर आल्या आहेत.

हरभरा

हरभऱ्याच्या स्पॉट (बिकानेर) किमती जुलै महिन्यात घसरत होत्या. या सप्ताहात त्या ०.४ टक्क्याने वाढून रु. ४,७९३ वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव प्रति क्विंटल रु. ५,२३० आहे.

मूग

मुगाच्या किमती जुलै महिन्यात वाढत होत्या. मुगाची स्पॉट किमत (मेरटा) या सप्ताहात ०.८ टक्क्याने घसरून प्रति क्विंटल रु. ६,३५० वर आली आहे. मुगाचा हमीभाव रु. ७,७५५ आहे. मुगाची आवक या महिन्यात कमी होऊ लागली आहे.

सोयाबीन

सोयाबीनची स्पॉट किंमत (इंदूर) जुलै महिन्यात उतरत होती. या सप्ताहात ती १.१ टक्क्याने वाढून प्रति क्विंटल रु. ६,४३१ वर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ४,३०० जाहीर झाला आहे.

तूर

तुरीची स्पॉट किंमत (अकोला) जुलै महिन्यात वाढत होती. ती या सप्ताहात ०.७ टक्क्याने वाढून प्रति क्विंटल रु. ७,६०३ वर आली आहे. तुरीचा हमीभाव रु. ६,६०० जाहीर झाला आहे.

कांदा

कांद्याच्या किमती जुलै महिन्यात घसरत होत्या. कांद्याची स्पॉट किंमत (पिंपळगाव) गेल्या सप्ताहात रु. १,२५८ होती; या सप्ताहात ती १.१ टक्क्यांनी घसरून रु. १,२४५ वर आली आहे.

टोमॅटो

टोमॅटोच्या किमती आतापर्यंत घसरत होत्या. या सप्ताहात मात्र टोमॅटोची स्पॉट किंमत (जुन्नर, नारायणगाव) वाढून ती रु. १,३६७ पर्यंत आली आहे. टोमॅटोची आवक अजूनही वाढती आहे.

(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति १७० किलोची गाठी; कपाशीची किंमत प्रति २० किलो.)

डॉ. अरुण प्र. कुलकर्णी

१३ ऑगस्ट २०२२

ब-६, कलाबसंत सोसायटी, १५वी गल्ली, भांडारकर रस्ता, पुणे ४११००४; फोन : ९४२०१७७३४८ arun.cqr@gmail.com

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT