Sangli News: युरोपियन आणि इतर देशांत सेंद्रिय हळदीची मोठी मागणी आहे. शेतकऱ्यांनी सेंद्रिय हळदीचे उत्पादन घेण्यासाठी पुढाकार घ्यावा. यासाठी शेतकऱ्यांना मसाले मंडळाकडून प्रोत्साहन देऊ, अशी ग्वाही मसाले मंडळाचे मुंबईचे उपसंचालक (विकास) सीमांत सैकिया यांनी दिली. .सांगली येथील बाजार चेंबर ऑफ कॉमर्स येथे गुरुवारी (ता. २६) आयोजित केलेल्या मसाले मंडळाच्या ३९ व्या स्थापना दिनानिमित्त ‘स्वच्छ आणि सुरक्षित मसाले’ हळद परिसंवादामध्ये ते बोलत होते..Organic Turmeric Farming : हळद पिकात सेंद्रिय शेतीचे महत्त्व .हा परिसंवाद केंद्र सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयअंतर्गत मसाले मंडळ (मुंबई), महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत हळद संशोधन योजना, कसबे डिग्रज (सांगली) तसेच सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला होता..Organic Turmeric Farming: सेंद्रिय हळदीची शेती, पावडरीतून मूल्यवर्धन .या परिसंवादाचे उद्घाटन चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अमर देसाई यांच्या हस्ते झाले. या वेळी मसाला मंडळाचे सहायक संचालक (विपणन) डॉ. ममता धनकुटे, हळद केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. मनोज माळी, हळद व्यापारी गोपाळ मर्दा, राजेंद्र मिनचे, मनोज पाटील, विनोद तोडकर, यांच्यासह शेतकरी उपस्थित होते..श्री. सैकिया म्हणाले, की जगात आपला देश हळद उत्पादनामध्ये आणि निर्यातीमध्ये अव्वल आहे. विविध राज्यांमध्ये हळदीसह अन्य मसाल्यांचे उत्पादन होते. गुणवत्ता पूर्ण आणि दर्जेदार मसाल्यांना चांगली मागणी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सेंद्रिय हळदीचे उत्पादन घेण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. यासाठी लागणारे मार्गदर्शन मसाला मंडळ करेल..ममता धनकुटे म्हणाल्या, की प्रत्येक देशांमध्ये निर्यातीचे निकष हे वेगवेगळे आहेत. त्यामुळे हे निकष शेतकऱ्यांनी समजून घेणे आवश्यक आहे. तरच हळदीची निर्यात शक्य आहे. त्याचबरोबर अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता ही तितकीच महत्त्वाची आहे. डॉ. मनोज माळी म्हणाले, की बियाण्यांची निवड, लागवड पद्धती आणि एकात्मिक कीड रोग व्यवस्थापन ही तीन सूत्रे शेतकऱ्यांनी अवलंबल्याने दर्जेदार हळदीचे उत्पादन शक्य आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.