Cotton Market  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Market : अंतिम टप्प्यात सेलू बाजार समितीत कापूस दरात सुधारणा

Cotton Rate : खरेदी हंगामाच्या अंतिम टप्प्यात सेलू बाजार समितीतील कापसाच्या दरात सुधारणा झाली आहे.

Team Agrowon

Parbhani News : जिल्ह्यातील सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीतील लिलावाद्वारे होणाऱ्या कापूस खरेदीस मुदत वाढ देण्यात आली आता शनिवार (ता. १९)पर्यंत कापूस खरेदी सुरू राहणार आहे. खरेदी हंगामाच्या अंतिम टप्प्यात सेलू बाजार समितीतील कापसाच्या दरात सुधारणा झाली आहे.

शनिवारी (ता. १२) कापसाला प्रतिक्विंटल किमान ७४३५ ते कमाल ७८३५ रुपये, तर सरासरी ७८२५ रुपये दर मिळाले. अशी माहिती बाजार समितीचे सचिव राजीव वाघ यांनी दिली.

शुक्रवारी (ता. १०) कापसाला प्रतिक्विंटल किमान ७७२५ ते कमाल ७८०० रुपये, तर सरासरी ७७८० रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता. ९) कापसाची १२१२ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ७६४० ते कमाल ७७६५ रुपये, तर सरासरी ७७२५ रुपये दर मिळाले.

सेलू बाजार समितीत २०२२ मध्ये १९ नोव्हेंबर रोजी जाहीर लिलावाद्वारे कापूस खरेदी सुरू झाली. त्या वेळी मुहूर्तावर प्रतिक्विंटल कमाल ९५३१ रुपये दराने खरेदी करण्यात आली. ३ डिसेंबरपर्यंत कमाल दर ९ हजार रुपयावर होते. त्यानंतर मात्र दरात घसरण सुरू झाली. २०२३ मध्ये ७ फेब्रुवारी रोजी कमाल दर ८ हजार रुपयांपेक्षा कमी तर किमान सात हजारांहून कमी झाले.

दरात किंचित चढ-उतार सुरूच राहिले. २५ मे रोजी कमाल दर सात हजार रुपयांहून कमी झाले. जून महिन्यात दरात सुधारणा झाली. जुलै महिन्यात दर सात हजारांवर गेले. अंतिम टप्प्यात कापूस दराची वाटचाल आठ हजार रुपयांकडे सुरू झाली आहे.परंतु आता जेमतेम ५ टक्के शेतकऱ्यांकडे देखील कापूस शिल्लक असण्याची शक्यता आहे.

सेलू बाजार समितीत यंदा साडेचार लाख क्विंटलवर कापूस खरेदी झाली आहे. अजूनही काही शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक असल्यामुळे लिलावाद्वारे होणाऱ्या कापूस खरेदीस बाजार समिती प्रशासनाने शनिवार (ता. १९) पर्यंत मुदत वाढ दिली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Raju Shetti: कोकणातील बागायतदारांची क्रूर थट्टा, राजू शेट्टींची मुख्यमंत्र्यांच्या मदतीच्या घोषणेवर टीका

Nashik ZP Budge: ‘झेडपी’च्या अर्थसंकल्पात कृषी, पशुसंवर्धनासाठी ७.१८ कोटी

Shade Net House: उन्हाळ्यामध्ये शेडनेट हाउसमधील व्यवस्थापन

Burhanpur Ankleshwar Highway: बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्ग चौपदरीकरणाच्या प्रक्रियेस गतीच नाही

Agrowon Podcast: कापसात काहिशी सुधारणा, कांदा भाव दबावातच, काकडीचा भाव टिकून, गव्हाची आवक वाढली, कैरीला उठाव

SCROLL FOR NEXT