Sugar Export Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Sugar Export : साखर निर्यातीवरील निर्बंध एक वर्षासाठी वाढवले

केंद्राने साखर निर्यातीचे सध्या सुरू असणारे निर्बंध ३१ ऑक्टोबर २०२३ पर्यंत वाढवले आहेत. यामुळे खुल्या साखर निर्यातीला (ओजीएल) परवानगी मिळण्याची शक्यता मावळली आहे.

टीम ॲग्रोवन

कोल्हापूर : केंद्राने साखर निर्यातीचे (Sugar Export Policy) सध्या सुरू असणारे निर्बंध (Sugar Export Restriction) ३१ ऑक्टोबर २०२३ पर्यंत वाढवले आहेत. यामुळे खुल्या साखर निर्यातीला (Open Sugar Export) (ओजीएल) परवानगी मिळण्याची शक्यता मावळली आहे. कारखान्यानुसार साखर निर्यात कोटा (Sugar Export Quota) दोन दिवसांत जाहीर होण्याची शक्यता आहे.

केंद्राने मे २०२२ च्या अखेरच्या सप्ताहामध्ये जागतिक बाजारात जादा प्रमाणात साखर जात असल्याने स्थानिक बाजारात साखरेचे दर वाढत असल्याचे सांगत निर्यातीवर निर्बंध आणले होते. तत्पूर्वी मेच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत ९५ लाख टनांहून अधिक साखर विविध देशांत निर्यात झाली होती. जादा साखर निर्यात झाल्यास देशात साखरेचा तुटवडा होईल, हे कारण देत केंद्राने निर्यातीवर अंकुश आणले. यामुळे साखर उद्योगात मोठी निराशा पसरली.

जूननंतर दोनदा थोड्या थोड्या प्रमाणात केंद्राने साखर निर्यातीला परवानगी दिली. पण तेवढे पुरेसे नसल्याचे कारण देत एवढी मागणी येईल तेवढी साखर निर्यात करण्यास केंद्राने परवानगी द्यावी, असा आग्रह साखर कारखानदारांचा राहिला.

केंद्राने मात्र यंदाचा हंगाम सुरू होऊन महिना झाला तरी याबाबत निर्णय दिला नव्हता. अखेर शनिवारी याबाबतचा आदेश काढून सध्या असलेली निर्बंधाची स्थिती अजून एक वर्ष तशीच राहील असे सांगण्यात आले आहे. या तारखेपर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत कारखान्यांनी केंद्राने कोटा दिल्याशिवाय निर्यात करू नये, असे आदेशात म्हटले आहे

या नव्या आदेशामुळे त्यामुळे कारखान्यांना हवी तेवढी साखर निर्यात करण्याबाबतचे निर्बंध ही कायम राहिले आहेत. केंद्राचा कारखान्यानुसार निर्यात कोटा देण्याच्या तयारीत आहे या बाबतचा कोटा दोन दिवसांतच जाहीर होण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pune Rainfall: पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला

MKCL Investment: ‘एमकेसीएल’ने सरकारमध्ये गुंतवणूक करावी; शरद पवार यांची अपेक्षा

Market License Cancellation: पणन संचालकांचा खासगी बाजारांवर कारवाईचा धडाका; ‘रामेश्वर, ‘कसमादे’, ‘जय गजानन’ बाजारांचे परवाने रद्द

Indigenous Livestock Breeds: सोळा नव्या देशी पशुजातींना मान्यता

Agro-Service Federation's Protest: प्रस्तावित आकृतिबंधाविरोधात कृषी सेवा महासंघाचे आंदोलन

SCROLL FOR NEXT