Ginners RCM Tax Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Ginners RCM Tax : जिनर्सवरील आरसीएम कर पाचवरून एक टक्‍का करा

Vidarbha Cotton Association Demand : देशभरातील जिनर्सकडून आकारल्या जाणाऱ्या आरसीएमचा (रिव्हर्स चार्ज मॅकेनिझम) परतावा सुलभ पद्धतीने आणि विनायास मिळावा त्याबरोबरच हा कर पाच टक्क्यांवरून एक टक्क्यांपर्यंत कमी करावा.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : देशभरातील जिनर्सकडून आकारल्या जाणाऱ्या आरसीएमचा (रिव्हर्स चार्ज मॅकेनिझम) परतावा सुलभ पद्धतीने आणि विनायास मिळावा त्याबरोबरच हा कर पाच टक्क्यांवरून एक टक्क्यांपर्यंत कमी करावा, अशी मागणी विदर्भ कॉटन असोसिएशनने केली. केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री गिरिराज सिंग यांची दिल्लीत भेट घेत ही मागणी करण्यात आली.

शेतकऱ्यांकडून कापूस खरेदीच्या वेळी जिनर्सला पाच टक्‍के आरसीएम कर भरावा लागतो. कापसापासून गाठ तयार करून त्याच्या विक्रीच्यावेळी या कराचा परतावा मिळण्याची प्रक्रिया सुरू होते. ही प्रक्रिया वेळकाढू असल्याने आरसीएमअंतर्गत परतावा मिळण्यास बराच कालावधी खर्च होतो. जिनिंग व्यावसायिक हंगामात कापसाचे चुकारे करण्यासाठी मोठी रक्‍कम खर्ची घालतात. शेतकऱ्यांना कापसाचे चुकारे नगद द्यावे लागतात.

त्यातच आरसीएमअंतर्गत कोट्यवधींची रक्‍कम गुंतून पडते. त्यामुळे बाजारातून उचल केलेल्या रकमेवर त्यांना व्याजाचाही भरणा करावा लागतो. ही परिस्थिती लक्षात घेता आरसीएम परताव्याची प्रक्रिया सुलभ असावी आणि हे पैसे मिळण्याकरिता ठरावीक कालावधी निश्‍चित करावा, अशी मागणी आहे. सध्या आरसीएमअंतर्गत पाच टक्‍के कर आकारणी होते. ही रक्‍कम अधिक असल्याने शासनाला व्यवहाराची माहितीच हवी असेल तर ती एक टक्क्यापर्यंत कमी करूनही घेता येईल.

त्यामुळे आरसीएम कर आकारणी ५ टक्क्यांवरून १ टक्‍का करावी. सरकीपासून १० ते ११ टक्‍के तेल मिळते. त्याची विक्री केल्यानंतर आरसीएमच्या एकूण करापैकी ३० ते ३५ टक्‍के कराचा परतावा मिळतो. उर्वरित परतावा गाठ विक्रीनंतर दिला जातो. सरकी पेंडच्या व्यवहारावर मात्र आरसीएम कराची आकारणी केली जात नाही. मात्र पेंडच्या व्यवहारावरदेखील असा कर आकारावा, अशी मागणी असल्याचे विदर्भ कॉटन असोसिएशनचे अध्यक्ष भावेश शहा यांनी सांगितले.

आरसीएम कर परताव्याची प्रक्रिया सुलभ करावी आणि हा परतावा निश्‍चित कालावधीत मिळावा, अशी मागणी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंग यांच्याकडे केली आहे. जिनिंग व्यावसायिकांना मोठी गुंतवणूक करावी लागते. अशातच करापोटी पैसे अडकून पडल्यास त्यांची अडचण होते. वस्त्रोद्योग मंत्र्यांनी आमचे म्हणणे ऐकून घेतले व सकारात्मक प्रतिसादही दिला आहे. परंतु ही बाब वित्त विभागाच्या अखत्यारित असल्याने वस्त्रोद्योग मंत्रिस्तरावरून वित्त मंत्रालयाला प्रस्ताव पाठविला जाणार आहे. आम्ही सुद्धा वित्तमंत्री निर्मला सीताराम यांची भेट घेणार आहोत.
भावेश शहा, अध्यक्ष विदर्भ कॉटन असोसिएशन, नागपूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election 2024 Update : भाजप पहिल्या स्थानावर; तर कॉँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर, पहिले कल काय सांगतात?

Agro Vision Krishi Exhibition : विकसनशील भाग म्हणून विदर्भ कृषी क्षेत्रात नावारूपास येणार

Maharashtra Election 2024 : सत्तास्थापनेसाठी दोन्हींकडून तयारी; मतदानात ०.९४ टक्क्यांची वाढ

Orange Growers Compensation : संत्रा बागायतदारांना भरपाईसाठी ‘तारीख पे तारीख’

Maharashtra Assembly Election Counting : पोस्टल मतमोजणीत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

SCROLL FOR NEXT