Groundnut Production Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Groundnut Market : चाळीसगावला भूईमुगाच्या शेंगांना विक्रमी दर

Groundnut Market Rate : चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. १२) भुईमुगाच्या वाळविलेल्या शेंगांना हंगामात सर्वाधिक ८३५० रुपये प्रतिक्विंटल रुपये दर मिळाला.

Team Agrowon

Jalgaon News : चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. १२) भुईमुगाच्या वाळविलेल्या शेंगांना हंगामात सर्वाधिक ८३५० रुपये प्रतिक्विंटल रुपये दर मिळाला. आवक कमी असून, हा भुईमूग शेंगांना यंदा मिळालेला विक्रमी दर आहे. सध्या खानदेशातील बाजारांत प्रतिदिन सरासरी १२० क्विंटल एवढीच भुईमूग शेंगांची आवक आहे.

खानदेशात भुईमुगाचे उत्पादन चोपडा, चाळीसगाव, भडगाव, यावल, धुळ्यातील शिरपूर या भागांत अधिक घेतले जाते. यंदा एप्रिल, मे व जूनमध्ये वाळविलेल्या किंवा कोरड्या भुईमुगाच्या शेंगांना सरासरी सात हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. जूनमध्ये काही दिवस साडेसात हजार रुपयांवरही दर चाळीसगाव, चोपडा, शिरपूर भागातील बाजारांत होता.

भुईमुगाच्या शेंगांसाठी जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव, चोपडा, अमळनेर, धुळ्यात शिरपूर या बाजार समित्या प्रसिद्ध आहेत. शेंगांची आवक कमी झाली आहे. कारण हंगाम मे अखेरिस संपला. सुरुवातीला दर साडेपाच ते साडेसहा हजार रुपये प्रतिक्विंटल असे होते. त्यात जूनमध्ये सुधारणा झाली.

जूनमध्ये दर टिकून होते. दर्जेदार शेंगांना जूनअखेरीस शिरपूर, अमळनेरात आठ हजार रुपये प्रतिक्विंटलचाही दर मिळाला होता. काही शेतकऱ्यांनी भुईमुगाच्या शेंगा वाळवून त्यांची व्यवस्थित साठवणूक केली. त्यांच्या शेंगांना आता चांगला दर मिळत आहे.

तेल कारखान्यांकडून खरेदी सुरू

काही तेल कारखानेदेखील थेट खरेदी करीत आहेत. एरंडोल (जि. जळगाव), धुळे येथील कारखान्यांत शेंगांची खरेदी सुरू असून, या शेंगांनाही आठ हजार रुपये प्रतिक्विंटलपेक्षा अधिकचा दर आहे. यंदा भुईमूग शेंगांचे उत्पादन (वाळविलेल्या) एकरी सात ते आठ क्विंटल एवढे आले आहे.

काहींनी चोख सिंचन व खत व्यवस्थापन करून वाळविलेल्या शेंगांचे एकरी ११ क्विंटल एवढे उत्पादन साध्य केले आहे. सध्या अमळनेर व शिरपूर येथील बाजारांत आठवड्यातून दोन ते तीन दिवस भुईमूग शेंगांची आवक होत आहे. ही आवक पुढे आणखी कमी होईल. कारण शेतकऱ्यांकडे फारसा साठा नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Lumpy Skin Disease Vaccination: लम्पी प्रतिबंधासाठी ३७.५२ लाख गोटपॉक्स लसमात्रांचे वाटप

Banana Price: बऱ्हाणपूर येथे केळीला कमाल २८०० रुपये दर

Ashwagandha Farmers Crisis: अश्वगंधावरील निर्बंधांमुळे शेतकरी अडचणीत

Rural Economy: सहकारातून ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक मजबूत : मोहोळ

Modern Education: विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणासह पायाभूत सुविधा देणे गरजेचे; उपमुख्यमंत्री पवार

SCROLL FOR NEXT