Banana Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Banana Rate : केळीला विक्रमी ३१०० रुपये दर

Banana Market : खानदेशात केळीदर या हंगामात विक्रमी स्थितीत पोहोचले असून, थेट किंवा शिवार खरेदीत कमाल दर ३१०० रुपये प्रतिक्विंटल मिळत आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात केळीदर या हंगामात विक्रमी स्थितीत पोहोचले असून, थेट किंवा शिवार खरेदीत कमाल दर ३१०० रुपये प्रतिक्विंटल मिळत आहे. केळीची आवक स्थिर आहे. पण उठाव अधिक व पुरवठा कमी अशी स्थिती असल्याने दरात मागील महिन्यात सतत सुधारणा झाली आहे.

खानदेशात मार्च ते जूनच्या मध्यापर्यंत केळी दर ५०० ते ९०० रुपये प्रतिक्विंटल होते. निर्यातीच्या केळीस १००० रुपये प्रतिक्विंटलचा दर या कालावधीत होता. या कालावधीत खानदेशात ४५० ते ५०० ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) केळीची आवक सुरू होती.

परंतु जूननंतर केळी आवक कमी झाली व दरात सुधारणा सुरू झाली. उत्तरेकडील श्रावण मासात केळीची मागणी वाढली. यानंतर राज्यासह अन्यत्रही श्रावण सुरू झाला आणि केळीदर हळूहळू २००० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचले.

ऑगस्टमध्ये केळी दरात सुधारणा सुरूच होती. या महिन्यात दर आठवड्याला क्विंटलमागे दरात २०० रुपयांची सरासरी वाढ झाली. दर्जेदार केळीचे दर ऑगस्टअखेरीस ३१०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचले.

कमी दर्जाची केळीही खानदेशात फारशी उपलब्ध नाहीत. खानदेशात सध्या धुळ्यात केळीची अल्प आवक आहे. नंदुरबारमध्येही रोज आठ ते १० ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) केळीची आवक आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT