Nagpur News : शिल्लक साठा, बाजारातील मागणी, सरकीच्या दरातील चढउतार हे घटक कापसाच्या दरावर परिणाम करणारे ठरतात. त्यानुसार यंदा कापसाचे दर हे ७००० ते ७६०० रुपयांच्या जवळपास राहण्याची शक्यता कापूस विपणन क्षेत्रातील तज्ज्ञांनी वर्तविली आहे.
कापूस विपणन क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या जागतिक बाजारात रुईच दर ९५ सेंट प्रति पाउंडच्या जवळपास स्थिर आहेत. हा दर १९९४ मधील दरापेक्षा १५ सेंटने कमी आहे. १९९४ रुईचे दर १ डॉलर १५ सेंट प्रतिपाऊंड होते. रुपयांतील अवमुल्यनामुळे देशाअंतर्गत बाजारात कापसाचे दर वाढल्याचे सांगण्यात आले.
परिणामी देशाअंतर्गत कापसातील तेजी ही मागणी-पुरवठा या सिद्धांतानुसार नसून ती रुपयाच्या अवमूल्यनामुळे आली आहे. दुसरीकडे २०२३-२४ या वर्षातील हंगामासाठी केंद्र सरकारने कापसाचा हमीभाव लांब धाग्याच्या कापसासाठी प्रतिक्विंटल ७०२० रुपये जाहीर केला आहे.
('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
मध्यम धाग्यासाठी ६६२० रुपये दर आहे. तर सरकीचे दर तीन हजार रुपये प्रतिक्विंटल आहेत. त्यामुळेच बाजारात सध्या कापसाला ७००० ते ७३०० रुपये दर मिळत आहे. सरकीचे दरातील चढउतार पुन्हा कापसाच्या दरावर परिणाम करतील. त्यामुळे हे दर ७२०० रुपयांवर स्थिरावतील, अशी शक्यता आहे.
वस्त्रोद्योग क्षेत्राकडून मागणी आणि दबाव वाढल्यानंतर केंद्र सरकारकडून कापसाच्या आयातीचे धोरण अवलंबिले जाते. त्याचाही परिणाम देशाअंतर्गत बाजारावर होतो. त्यातच सरकी ढेपेला दूधकांडीचा पर्याय उपलब्ध झाला आहे. परिणामी सरकीचे दर वाढण्याची शक्यता नसल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
कापसाचा हमीभाव, मिळालेला दर (रुपये)
वर्ष---किमान---कमाल
२०२२-२३---६३८०---७८६०
२०२१-२२---६०२५---९४६०
२०२०-२१---५८२५---६४५४
२०१९-२०---५५५०---५१८३
२०१८-१९---५४५०---५७२६
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खाद्यतेलाचे दर सरकारने दबावात ठेवले आहेत. त्याचाही परिणाम कापसाच्या दरावर झाला आहे. आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत कमी झालेली मागणी अशी अनेक कारणे दर कमी असण्यामागे आहेत. तरीसुद्धा ७०२० रुपये या हमीभावापेक्षा ७५०० रुपयांपर्यंत कापसाचे दर राहतील.- गोविंद वैराळे, कापूस विपणन विषयाचे अभ्यासक.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.