Cashew Nut  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cashew Market : काजू बी चा दर प्रति किलो १०० ते १०५ रुपये

काजू बी अपेक्षित उठाव न मिळाल्यामुळे मागील आठवड्यात काहीसा वाढलेला दर पुन्हा घसरला आहे.

Team Agrowon

Cashew Market Update काजू बी (Cashewnut) अपेक्षित उठाव न मिळाल्यामुळे मागील आठवड्यात काहीसा वाढलेला दर (Cashew Rate) पुन्हा घसरला आहे. सध्या काही व्यापारी प्रतिकिलो १०० ते १०५ रुपयांनी काजू बी खरेदी करीत आहेत.

जिल्ह्यात फेब्रुवारीपासून काजू हंगाम सुरू झाला. सुरुवातीला अत्यल्प प्रमाणात काजू बी बाजारपेठेत आली. त्यामुळे सुरुवातीला अवघ्या ११५ रुपयांनी काजू बी खरेदी केली जात होती. परंतु बाजारपेठेत अपेक्षेप्रमाणे आवक न झाल्याने काजू बी चा दर वाढत तो प्रतिकिलो १३० पर्यंत पोहोचला होता.

त्यानंतर मार्चमध्ये काजू बीची आवक मोठ्या प्रमाणात वाढली. दररोज शेकडो टन बी आठवडा बाजारांमध्ये विक्रीकरीता येऊ लागली. काजू बी आवक आणि त्या तुलनेत व्यापाऱ्यांकडे कारखानदारांकडून नसलेली मागणी यामुळे काजू बीच्या दरात घसरण होत गेली. पंधरा दिवसांपूर्वी हा दर अवघ्या १०० रुपयांवर आला होता. त्यानंतर आठ दिवसांनी पुन्हा पाच ते दहा रुपयांनी काजू बीच्या दरात वाढ झाली.

परंतु आता पुन्हा दरात घसरण झाली आहे. व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या शेकडो टन मालाला उठाव नसल्यामुळे व्यापारीदेखील काहीसे कोड्यात सापडले आहेत. त्यामुळे काही व्यापारी प्रतिकिलो १०० ते १०५ रुपयांनी काजू बीची खरेदी करीत आहेत.

काजूचा हंगाम जरी संपला असला तरी अजूनही काजू उत्पादकांकडे शेकडो टन माल शिल्लक आहे. हे उत्पादक दर वाढण्याच्या प्रतीक्षेत आहेत. परंतु प्रत्यक्षात दर दिवसेंदिवस कमी होत आहे.

काजू हंगाम सुरू झाल्यापासून सातत्याने काजू बीच्या दरात चढउतार पाहायला मिळाले. सुरुवातीला ११५ रुपये दर होता. त्यानंतर तो १३० ते १३५ पर्यंत पोहोचला परंतु सध्या १०० रुपयांनी काजू बी खरेदी केली जात आहे. काजू बी कमीत कमी १५० ते १६० रुपये दर मिळाला पाहीजे.
- मंगेश गुरव, काजू उत्पादक शेतकरी, खांबाळे, ता. वैभववाडी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: कोकण, घाटमाथा, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज

Drought Situation: दुष्काळस्थितीत यंत्रणांनी सतर्क राहावे : कृषिमंत्री भरणे

Ghodganga AGM Controversy: ‘घोडगंगा’च्या सभेत घोषणाबाजीने गोंधळ

Illegal Water Extraction: तलाव आटले, तरीही अवैध पाणीउपसा सुरू

Farmers Protest: २३ सप्टेंबरला मंत्र्यांना काजू, बदाम पाठवून राज्यभर आंदोलन, किसान सभेची घोषणा

SCROLL FOR NEXT