Kabuli Chana
Kabuli Chana  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Kabuli Chana Rate : खानदेशात मोठ्या काबुली हरभऱ्याच्या दरात सुधारणा

Team Agrowon

Kabuli Chana Market जळगाव ः खानदेशात पांढऱ्या प्रकारातील मोठ्या काबुली हरभऱ्याचे (Kabuli Chana Rate) (मॅक्सिको किंवा डॉलर) दर प्रतिक्विंटल ९३०० ते १०५५५ आणि सरासरी १० हजार रुपये प्रतिक्विंटल झाले आहेत.

मोठ्या काबुली हरभऱ्याची आवक (Chana Arrival) बाजार समित्यांत कमी आहे. त्याची लागवड खानदेशात अत्यल्प क्षेत्रात केली जाते.

जळगाव जिल्ह्यात चोपडा, रावेर व जामनेर, धुळ्यात शिरपूर आणि नंदुरबारात शहादा तालुक्यात मोठ्या काबुली हरभऱ्याची लागवड असते. केळी, कापूस उत्पादन केळीचे क्षेत्र रिकामे झाल्यानंतर किंवा कापूस वेचणी पूर्ण झाल्यानंतर डिसेंबरमध्ये संबंधित पिकातील ठिबकवर त्याची लागवड करतात.

त्याचे उत्पादन एकरी सहा ते सात क्विंटलपर्यंत येते. काही शेतकरी चांगले नियोजन करून एकरी आठ ते नऊ क्विंटलपर्यंतचे उत्पादन घेतात. मागील हंगामातही चांगले उत्पादन आले, पण दर कमाल साडेनऊ हजार रुपये, असे मार्चअखेरिस व एप्रिलमध्येही मिळत होते. पण यंदा मार्चमध्येच दरांची कमाल पातळी १० हजार ५५५ रुपये प्रतिक्विंटलवर पोहोचली आहे.

गुजरातमधील बडोदा, सुरत, अहमदाबाद, मध्य प्रदेशातील इंदूर, बडवानी भागातील खरेदीदार, व्यापारी थेट चोपडा, शिरपूर भागांतून शिवार खरेदी करून घेत आहेत. यामुळे बाजारात आवक कमी आहे. चोपडा येथील बाजार समितीत शुक्रवारी (ता. २४) मोठ्या काबुली हरभऱ्याची (डॉलर किंवा मॅक्सिको) १२२५ क्विंटल आवक झाली.

त्यास किमान ९३८१ व कमाल १०६९९आणि सरासरी ९९९९ रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. अमळनेर येथील बाजारातही दर पातळी कमाल १० हजार रुपयांपर्यंत पोहोचली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला अमळनेर, चोपडा येथील बाजारात मोठ्या काबुली हरभऱ्याचे दर कमाल साडेनऊ हजार रुपये प्रतिक्विंटल होते.

पण त्यात या आठवड्यात सुधारणा झाली आहे. खानदेशात सध्या रोज मिळून चार हजार क्विंटल काबुली हरभऱ्याची आवक होत आहे. जळगावमधील चोपडा, अमळनेर, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारमधील शहादा व नंदुरबार बाजार समितीत आवक होत आहे. पुढे आवक कमी होईल. त्यामुळे दरात सुधारणांचे संकेतही आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : एप्रिलमध्ये पिकांचे २७ कोटींचे नुकसान

Agriculture Irrigation : आक्रोश मोर्चाचे रूपांतर उपोषणात

Cotton Cultivation : सरासरीच्या तुलनेत यंदा कपाशीची लागवड वाढणार

Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

Drought Monitoring : दुष्काळ पाहणी पथकांचा सोपस्कार

SCROLL FOR NEXT