Soybean Procurement  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

NAFED Soybean Procurement : सोयाबीन खरेदीत रंगराव पाटील खासगी बाजार समिती अव्वल

Latur Soybean Market : नाफेडमार्फत शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन खरेदी करण्यासाठी लातूर जिल्ह्यात १६ नाफेड खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली होती. सोयाबीन खरेदी करण्याकरिता ऑनलाइन शेतकरी नोंदणी १ ऑक्टोबर २०२४ पासून सुरू करण्यात आली होती.

Team Agrowon

Latur News : सरलेल्या हंगाम २०२४-२०२५ मध्ये केंद्र सरकारकडून आधारभूत दराने नाफेडमार्फत सोयाबीनची खरेदी करण्यात आली. यात लोणी (ता. उदगीर) येथील रंगराव पाटील खासगी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या केंद्राने सर्वाधिक ८४ हजार क्विंटल सोयाबीन खरेदी करून जिल्ह्यात पहिला क्रमांक पटकावला आहे.

नाफेडमार्फत शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन खरेदी करण्यासाठी लातूर जिल्ह्यात १६ नाफेड खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली होती. सोयाबीन खरेदी करण्याकरिता ऑनलाइन शेतकरी नोंदणी १ ऑक्टोबर २०२४ पासून सुरू करण्यात आली होती. लोणी येथील रंगराव पाटील नाफेड ८४हजार क्विंटल सोयाबीन केंद्राने खरेदी केली आहे.

या खरेदी केंद्राकडे ३१८० शेतकऱ्यांनी नोंद केली होती. प्रत्यक्षात सोयाबीन खरेदी ही १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आली. अंतिम तारीख ६ जानेवारी २०२५ होती. या कालावधीमध्ये लोणी येथील रंगराव पाटील खासगी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या केंद्राने ८४ हजार १२ क्विंटल सोयाबीन खरेदी करून जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

जिल्ह्यातील सेलू केंद्राने ५७ हजार १२८ क्विंटल सोयाबीन खरेदी करून जिल्ह्यात दुसरा तर आष्टा नाफेड खरेदी केंद्राने ४३ हजार ९२१ क्विंटल खरेदी करून तिसरा क्रमांक पटकावला आहे. रामचंद्रराव पाटील तळेगावकर खरेदी केंद्राकडे ५२४२ शेतकऱ्यांनी नोंदणी होती. ११२९ शेतकऱ्यांकडील २४४३६ क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आली आहे. रंगराव पाटील खरेदी केंद्राकडे ३१८० शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. प्रत्यक्षात मात्र ३०५७ शेतकऱ्यांनी या केंद्रावर सोयाबीन विक्री करण्यास पसंती दिली आहे.

या केंद्रावर शेतकऱ्यांकडील सोयाबीन घेण्यासाठी ४ ऑटोमॅटिक मशिन, ८ चाळण्या, त्यांच्या वाहनाच्या पार्किंगची व मुक्कामाची व्यवस्था तसेच पिण्याच्या पाण्याची, त्यांच्या नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती. शेतकरी वर्गाकडून रंगराव पाटील कृषी उत्पन्न खासगी बाजार नाफेड केंद्राचे अध्यक्ष भास्कर रंगराव पाटील व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

151 Years Of IMD: हवामान आधारित कृषी सल्ल्याद्वारे शेतकरी सेवेत ‘आयएमडी’

Chickpea Prices Crash: पीक काढणीपूर्वीच हरभऱ्याचे भाव घसरले; शेतकऱ्यांनी जगायचे कसे?; केंद्राच्या हस्तक्षेपाची सिद्धरामय्यांची मागणी

Farm Roads: कोल्हापुरातील १७७ गावांतील शिवार रस्त्यांचे भाग्य उजळणार

Agrowon Podcast: सोयाबीन दरात सुधारणा, कापूस दर स्थिर, काकडीचे दर टिकून,कोथिंबीर दबावातच,कांदा दरात चढ उतार

Agriculture Irrigation: वाकुर्डे बुद्रुक उपसा सिंचन योजनेचे पहिले आवर्तन सुरू

SCROLL FOR NEXT