Soybean Futures Ban: सोयाबीनवरील वायदेबंदी तत्काळ मागे घ्या: खासदार रवींद्र चव्हाण

MP Ravindra Chavhan Demand: सोयाबीन आणि इतर शेतीमालावर वायदेबंदी लादल्यामुळे शेतकऱ्यांना कवडीमोल दरावर उत्पादन विकावे लागत आहे. यावर खासदार रवींद्र चव्हाण यांनी लोकसभेत आवाज उठवत, बंदी तात्काळ मागे घेण्याची मागणी केली आहे.
Ravindra Chavhan
Ravindra ChavhanAgrowon
Published on
Updated on

Nanded News: वायदे बाजारातील बंदीमुळे शेतकऱ्यांना सोयाबीनसह इतर शेतीमाल कवडीमोल दराने विकावा लागत आहे. यामुळे सोयाबीन आणि इतर पिकांची वायदे बाजारातील आणलेली बंदी तत्काळ मागे घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी खासदार रवींद्र चव्हाण यांनी गुरुवारी (ता. ३) लोकसभेत केली.

Ravindra Chavhan
Summer Soybean Sowing : उन्हाळ सोयाबीन खानदेशात कमी

केंद्र सरकारने सोयाबीनसह इतर पिकांचे वायदे बाजारातील ‘एनसीडीईएक्स’वरून होणारी खरेदी विक्रीला नोव्हेंबर २०२१ मध्ये बंदी आणली होती. वायदे बाजारातील दर हे शेतकऱ्यांना भावाचे दिशादर्शक म्हणून काम करतात, कोणत्या मालाची कोणत्या वेळी चांगल्या दरात विक्री करावी यासाठी वायदे बाजारातील दर शेतकऱ्यांना मदत करतात.

Ravindra Chavhan
Soybean Price Demand: पंतप्रधानांनी वचनाला जागत सोयाबीनला सहा हजार दर द्यावा

परंतु वायदे बाजारातील सोयाबीन व इतर पिकांच्या बंदीमुळे शेतकऱ्यांना भाववाढीचा अंदाज लागत नाही. कमी दरामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.

दरासाठी परिणामी त्यांना खासगी व्यापाऱ्यावर अवलंबून राहावे लागते आहे. यामुळे सोयाबीन व इतर पिकांची वायदे बाजारातील आणलेली बंदी तत्काळ मागे घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी या वेळी खासदार रवींद्र चव्हाण यांनी लोकसभेत केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com