Raisin Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Raisin Market : जादा आवकेमुळे बेदाणा दरात घसरण

बाजारात बेदाण्याच्या मागणीपेक्षा आवक जादा होत असल्याने त्याचा परिणाम बेदाण्याच्या दरावर झाला आहे. त्यामुळे बेदाण्याचे दर प्रति किलोस २० रुपयांनी कमी झाले आहेत.

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Raisin Market News सांगली ः बाजारात बेदाण्याच्या मागणीपेक्षा आवक (Raisin Arrival) जादा होत असल्याने त्याचा परिणाम बेदाण्याच्या दरावर (Raisin Rate) झाला आहे. त्यामुळे बेदाण्याचे दर प्रति किलोस २० रुपयांनी कमी झाले आहेत. पंधरा दिवसांत प्रति किलोस ४० रुपयांनी दर घटले असल्याने बेदाणा उत्पादक (Raisin Producer Farmers) शेतकऱ्यांना त्याची झळ बसू लागली आहे.

राज्यात सर्वाधिक बेदाणा सांगली जिल्ह्यात होतो. त्यानंतर सोलापूर आणि नाशिकचा क्रमांक लागतो. सांगली, तासगाव आणि पंढरपूर येथील बाजार समितीत बेदाण्याचे सौदे असतात.

बेदाण्याला वर्षभर मागणी असते. त्यामुळे वर्षभर सौदे सुरू असतात. पंढरपूर येथे आठवड्यातून एकदा सौदा होतो.

बाजार समितीत सुमारे २० हजार टन बेदाणा विक्रीसाठी येत आहे. त्यापैकी चाळीत ते पन्नास टक्के बेदाण्याचा उठाव होत असल्याचे बेदाणा उद्योगातील जाणकारांनी सांगितले आहे.

वास्तविक पाहता देशांतर्गत बाजारपेठेत बेदाण्याला मागणीही चांगली आहे. तरीदेखील फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात बेदाण्याचे दर २० रुपयांनी कमी झाले होते.

यंदाच्या हंगामात बाजारपेठेत मागणी आहे. परंतु मागणीपेक्षा बाजार समितीत बेदाण्याची आवक अधिक होत आहे. त्यामुळे दरात घसरण होत आहे.

बाजार समितीत सौद्यात बेदाण्याला अपेक्षित दर मिळाला नाही, की शेतकरी बेदाणा शीतगृहात ठेवण्यासाठी पुढे येत आहेत. त्यामुळे दराची परिस्थिती पाहूनच बेदाणा विक्रीचे नियोजन उत्पादक शेतकरी आतापासूनच करू लागले आहेत.

यंदा द्राक्षाच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. त्यामुळे शेतकरी बेदाणा निर्मितीकडे वळला आहे. यामुळे उत्पादन वाढत आहे. गेल्यावर्षीपेक्षा यंदा बेदाण्याचे उत्पादन अधिक होईल, असे शेतकरीही सांगत आहेत.

बेदाण्याची मागणीपेक्षा आवक जास्त आहे. त्यामुळे दरात घसरण होत आहे. शेतकऱ्यांनी आवक आणि दराचा अंदाज घेऊनच बेदाणा विक्रीसाठी घेऊन यावा. दर कमी आहे, म्हणून शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नका.

- सुशील हडदरे, बेदाणा व्यापारी, सांगली

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

India-New Zealand FTA : भारत-न्युझीलंड मुक्त व्यापार करारावर दोन्ही देशांतील प्रतिनिधींनी केली स्वाक्षरी

Beed Massajog Sarpanch Election: मस्साजोग सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुखांच्या पत्नीचा पराभव

Modern Soil Testing: माती परीक्षणाचे आधुनिक तंत्र

Ocean Floating Algae: जगभरातील सागरांमध्ये होतेय तरंगत्या शैवालाची वेगाने वाढ

Agriculture Success Story: मनमोहक कार्नेशनसह आकर्षक जिप्सोफिला

SCROLL FOR NEXT