Bedana Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Bedana Market : ‘शून्य पेमेंट’ करिता बेदाणा बाजारपेठा बंद

Bedana Rate : सध्या शीतगृहात शेतकऱ्यांचा ५० ते ६० हजार टन बेदाणा शिल्लक आहे. दिवाळीपर्यंत बेदाण्याचे दर टिकून राहिल्याने बेदाणा उत्पादकांना दिलासा मिळाला आहे.

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Sangli News : सांगली आणि तासगाव कृषी बाजार समितीच्या बेदाणा बाजारपेठेतील व्यापारी आणि शेतकऱ्यांचे सर्व आर्थिक व्यवहार पूर्ण होईपर्यंत २६ नोव्हेंबरपर्यंत बेदाणा बाजारपेठा बंद ठेवल्या आहेत. सध्या शीतगृहात शेतकऱ्यांचा ५० ते ६० हजार टन बेदाणा शिल्लक आहे. दिवाळीपर्यंत बेदाण्याचे दर टिकून राहिल्याने बेदाणा उत्पादकांना दिलासा मिळाला आहे.

राज्यात सुमारे ३ लाख बेदाण्याचे उत्पादन झाले होते. जानेवारी महिन्यापासून नव्या बेदाणा विक्रीस प्रारंभ झाला. मे महिन्यात बेदाण्याची मागणी कमी असल्याने दर कमी होते. जून, जुलै महिन्यापासून बेदाण्याचा दर प्रतिकिलो पाच ते दहा रुपयांनी वाढण्यास प्रारंभ झाला. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर तसेच गणपती, दसरा, दिवाळी या उत्सवांमुळे बेदाण्याच्या मागणीत वाढ झाली. त्यामुळे दरही वाढले.

या तीन महिन्यांमध्ये बेदाण्याचे दर टिकून होते. त्यामुळे दिवाळीपर्यंत झालेल्या सौंद्यामध्ये बेदाण्याला चांगले दर मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. बेदाणा बाजारपेठेतील व्यापारी आणि शेतकऱ्यांचे सर्व आर्थिक व्यवहार पूर्ण होईपर्यंत सांगली-तासगाव बेदाणा असोसिएशनने सोमवार (ता.३०) ऑक्टोबर ते २५ नोव्हेंबर या कालावधीत बेदाणा सौदे शून्य पेमेंटसाठी बंद ठेवण्याचा निर्णय झाला आहे. अर्थात झिरो पेमेंटसाठी सौदे बंद आहेत.

दरवर्षी दिवाळीच्या आधी बाजार समिती आवारातील बेदाणा बाजारपेठेतील अडत व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या बिलांचे व्यवहार पूर्ण (झिरो पेमेंट) केले जातात. यावर्षी बाजार समितीकडून शेतकरी व्यापारी येणे- देणे व्यवहार पूर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.

रविवारच्या बैठकीत सौद्यांबाबत निर्णय

बेदाण्याला वर्षभर मागणी असल्याने गरजेनुसार शेतकरी बेदाण्याची विक्री करतात. आतापर्यंत २ लाख ४० ते २ लाख ५० हजार टन बेदाण्याची विक्री झाली आहे. तर ५० ते ६० हजार टन बेदाणा शीतगृहात शिल्लक आहे.

२६ नोव्हेंबरला बेदाणा असोसिएशन आणि बाजार समिती यांच्यामध्ये झिरो पेमेंटबाबत बैठक होणार आहे. त्यात सविस्तर माहिती घेऊन २७ नोव्हेंबरला बेदाणे सौदे सुरू करण्याबाबत निर्णय होईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heavy Rain Update : बार्शी तालुक्यात अतिवृष्टीने शेतीपिकांचं नुकसान; खासदार ओम राजेनिंबाळकरांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Agriculture Input GST : शेती अवजारांवरील जीएसटी रद्द होणार?

Crop Damage Compensation : सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ४० कोटींची भरपाई

Voter Fraud: चंद्रपूरमध्ये एकच घरात ११९ मतदार; मतदार यादीतील आणखी एक गैरप्रकार उघड

Ladki Bahin Yojana: साताऱ्यात ८४ हजार अपात्र लाडक्या बहीणी; १५१ कोटींची वसुली होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT