Raisin Production  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Raisin Market : ढगाळ वातावरणामुळे बेदाणा उत्पादक धास्तावला

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि बहुतेक भागात हलका पाऊस झाला आहे. त्यामुळे बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Team Agrowon

Raisin Market News सांगली : जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण (Cloudy Weather) असल्याने बेदाणा निर्मितीस (Raisin Production) अडचणी येऊ लागल्या आहेत. परिणामी बेदाणा तयार होण्यास विलंब लागत आहे. यामुळे बेदाणा उत्पादक शेतकरी धास्तावला आहे.

जिल्ह्यातील कवठे महांकाळ तालुक्यातील नागज परिसरात बेदाणा निर्मितीची शेड उभी आहेत. गेल्या महिन्यापासून बेदाणा निर्मितीचा हंगाम सुरू आहे. पोषक वातावरण असल्याने दर्जेदार बेदाणा तयार होत आहे. बेदाणा हंगाम मध्यावर आला आहे. सुमारे तीन ते चार हजारांहून अधिक बेदाणा शेडवर बेदाणा तयार करण्याची लगबग सुरू आहे.

दरम्यान, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि बहुतेक भागात हलका पाऊस झाला आहे. त्यामुळे बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या ढगाळ वातावरणामुळे बेदाणा काळपट होणे, दर्जा घसरणे, आणि बेदाणा तयार होण्यासाठी विलंब होणे या साऱ्यांमुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. त्यातच पाऊस पडला तर बेदाण्याचे नुकसान होईल या भीतीने बेदाणा तयार करण्यासाठी नियोजनात बदल करत असल्याचे चित्र आहे.

वातावरणात बदल झाल्याने बेदाणा तयार होण्यास अडचणी येत आहेत. परिणामी, काही प्रमाणात दर्जाही घसरत आहे.

- सुनील माळी, बेदाणा शेड मालक, केरेवाडी, ता. कवठेमहांकाळ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT