Bedana Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Bedana Market : बेदाण्याची मागणी वाढली

Bedana Market Rate : गेल्या दोन महिन्यांपासून बेदाण्याचे दर टिकून आहेत. सध्या बेदाण्याला किमान ९० ते कमाल २२० रुपये प्रति किलो दर मिळत आहे.

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Sangli News : सणांच्या पार्श्‍वभूमीवर बाजारपेठेत बेदाण्याची मागणी वाढली असून उठावही आहे. गेल्या दोन महिन्यांपासून बेदाण्याचे दर टिकून आहेत. सध्या बेदाण्याला किमान ९० ते कमाल २२० रुपये प्रति किलो दर मिळत आहे.

आतापर्यंत सुमारे दीड लाख टन बेदाण्याची विक्री झाली असून आणखी एक लाख ३० हजार टन बेदाणा शिल्लक आहे. बेदाण्याचे उत्पादन वाढले असले तरी, दर टिकून राहिल्याने याचा फायदा उत्पादक शेतकऱ्यांना झाला.

राज्यात दोन वर्षांपूर्वीपेक्षा गत हंगामात बेदाण्याचे उत्पादन सुमारे २ लाख ८० हजार टन झाले होते. गेल्या वर्षी बेदाण्याचे उत्पादनात सुमारे १ लाख टनांनी वाढले होते. त्यामुळे बेदाण्याच्या दरात घट होईल, असा अंदाज होता.

हंगामाच्या सुरुवातीला बेदाण्याचे दर कमी-अधिक होते. मे महिन्यात बेदाण्याच्या दरात प्रति किलोस २० रुपयांनी घट झाली होती. त्यामुळे बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांनी बेदाणा विक्रीचे थांबवले होते. त्यानंतर बेदाण्याच्या मागणीत वाढ होऊ लागल्याने बेदाण्याच्या दरात प्रति किलोस पाच रुपयांनी वाढ झाली.

ऑगस्टपासून गणपती, दसरा आणि दिवाळी या सणाच्या पार्श्‍वभूमीवर बेदाणा खरेदी करण्याची लगबग सुरू झाली आहे. या सणानिमित्त बेदाण्याला मोठी मागणी असून उठावही होतो. त्यामुळे शेतकरी बेदाणा विक्रीचे नियोजन करू लागले होते. ऑगस्टमध्ये बेदाण्याला ९० रुपयांपासून २२० रुपयांपर्यंत प्रति किलो दर मिळाला होता. गेल्या दोन महिन्यांपासून बेदाण्याचे दर टिकून असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

२ लाख टन बेदाण्याची विक्री

नव्या बेदाण्याचा हंगाम फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू झाला. सुरुवातीला नव्या बेदाण्याची आवक कमी होती. मार्च महिन्यापासून नव्या बेदाण्याच्या आवकेत वाढ होऊ लागली. बाजारात बेदाण्याची मागणी वाढू लागल्याने आवकही मोठ्या प्रमाणत होऊ लागली. सुमारे आठ महिन्यात दोन लाख टन बेदाणा विक्री झाल्याचा अंदाज व्यापारी वर्गाने व्यक्त केला आहे.

दीड महिनाच मार्केट

दिवाळीच्या दरम्यान, शून्य पेमेंटसाठी बेदाण्याचे सौदे एक महिना बंद ठेवले जातात. या कालावधीत व्यापारी, शेतकऱ्यांची येणी-देणी पूर्ण केली जातात. त्यामुळे बेदाणा विक्रीसाठी दीड महिन्याचा कालावधी शिल्लक राहिला आहे. या कालावधीत शिल्लक राहिलेल्या बेदाण्यांपैकी ५० टक्के बेदाणा विक्री होईल, अशी शक्यता बाजार समितीने वर्तवली आहे.

गेल्या दोन महिन्यापासून बाजारपेठेत बेदाण्याचे दर टिकून राहिले आहेत. सध्या सणाच्या पार्श्‍वभूमीवर बेदाण्याची मागणी वाढल्याने आवकही चांगली होत असून उठावही आहे.
- सुशील हडदरे, बेदाणा व्यापारी, सांगली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT