Bedana Market  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Bedana Market : बेदाणा सौदे ‘झिरो पेमेंट’साठी ३० ऑक्टोबरपासून बंद

Raisin Rate : सांगली-तासगाव बेदाणा असोसिएशनने ३० ऑक्टोबर ते २५ नोव्हेंबर या कालावधीत बेदाणा सौदे ‘झिरो पेमेंट’साठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Sangli News : सांगली-तासगाव बेदाणा असोसिएशनने ३० ऑक्टोबर ते २५ नोव्हेंबर या कालावधीत बेदाणा सौदे ‘झिरो पेमेंट’साठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. खरेदीदारांनी महिन्यात व्यवहार पूर्ण करावेत, असे आवाहन असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र कुंभार यांनी केले आहे.

ते म्हणाले, की देणे-घेण्याचा हिशेब पूर्ण झाल्यानंतर २७ नोव्हेंबरपासून नवीन बेदाणा सौदे सुरू होणार आहेत. बेदाण्याची वर्षाला कोट्यवधींची उलाढाल होते. यापूर्वी अनेक व्यापारी आणि अडते शेतकऱ्यांना बुडवून पळून गेले आहेत. त्यासाठी गेल्या दहा वर्षांपासून सांगली-तासगाव बेदाणा असोसिएशनने दिवाळीत ‘झिरो पेमेंट’ हा उपक्रम यशस्वीपणे राबविला आहे.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सध्या मार्केटमध्ये अनेक व्यापारी थकबाकीमुळे चिंतेत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या उपक्रमांमध्ये अडते व व्यापाऱ्यांनी आपाप‌ले पैसे एक महिन्याच्या सुटीमध्ये येणे-देण्याचा हिशेब पूर्ण करण्याचा नियम आहे.

त्याची यादी सांगलीतील पूजा ट्रेडर्स आणि तासगावमधील गणेश ट्रेडिंग कंपनीमध्ये सादर करावी. दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘झिरो पेमेंट’ करायचेच असा निश्चय करीत ३० ऑक्टोबर ते २५ नोव्हेंबरअखेर सौदे बंद असणार आहेत.

बाजार समितीला द्यावी लागणार कागदपत्रे

सौदे सुरू होण्याआधी अडत, खरेदीदारांनी पेमेंट येणे-देणे क्लिअर करायचे आहे. म्हणजेच ‘झिरो पेमेंट’ करायचे आहे. कुणीही पुढील तारखेचे चेक द्यायचे व घ्यायचे नाहीत, असेही परिपत्रकात नमूद केले आहे.

‘झिरो पेमेंट’ पूर्ण झाल्याचे पत्र सर्व व्यापाऱ्यांनी दिवाळीनंतर सांगली बाजार समितीला द्यावे. झिरो पेमेंट पूर्ण झाल्याचे ज्याचे पत्र असेल त्यालाच सौदा काढण्यास परवानगी देणार असल्याचे सभापती शिंदे व सचिव महेश चव्हाण यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT