Wheat  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Wheat : गव्हावरील आयात शुल्क रद्द करण्याचा प्रस्ताव

देशाच्या अनेक भागात गव्हाच्या किमती २७०० रुपये क्विंटलपर्यंत पोचल्या आहेत. सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गव्हाच्या किमतीत होणारी ही वाढ केंद्र सरकारसाठी डोकेदुखी ठरत आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

नागपूर : सण- उत्सवांच्या पार्श्वभूमीवर गव्हाच्या किमतीत (Wheat Rate) होणाऱ्या वाढीने केंद्र सरकारची चिंता वाढली आहे. त्यामुळे दरावर नियंत्रणासाठी आयात शुल्कात (Import Duty) कपात करण्यासोबतच इतर अनेक उपाय केंद्र सरकारस्तरावर प्रस्तावित असल्याचे सूत्रांनी सांगितले. (Wheat Export)

देशाच्या अनेक भागात गव्हाच्या किमती २७०० रुपये क्विंटलपर्यंत पोचल्या आहेत. सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गव्हाच्या किमतीत होणारी ही वाढ केंद्र सरकारसाठी डोकेदुखी ठरत आहे. त्या पार्श्वभूमीवर गव्हाचे दर नियंत्रित राहावेत, या साठी केंद्र सरकार आपल्या कोट्यातून काही व्यापाऱ्यांना गव्हाचा पुरवठा करण्याची शक्यता आहे. त्यासोबतच गव्हाच्या साठेबाजीवर देखील मर्यादा घालण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र त्या संदर्भाने कोणताही अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही. सण-उत्सवाच्या काळात गव्हासोबत पिठाचे (आटा) भाव वाढणार नाहीत, याकरिता ही खबरदारी घेतली जात आहे.

देशांतर्गत बाजारपेठेत गव्हाचे दर २७०० रुपये क्विंटलपेक्षा वर गेले असले तरी वैश्विक बाजाराच्या तुलनेत ते स्थानिक स्तरावर कमीच आहेत. त्यातच रशिया आणि युक्रेनने त्यांच्या गोदामातील गव्हाला वाहतुकीसाठी परवानगी दिली आहे. सोबतच अमेरिकेत देखील यंदा गव्हाचे उत्पादन चांगले होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरात घसरण होईल, असे सांगितले जाते. परंतु सध्या भारतात गव्हाचे दर तेजीत असल्याने गहू आयात वाढावी, यासाठी सध्याच्या ४० टक्के आयात शुल्कात सवलत मिळावी किंवा ते पूर्णपणे माफ करावे, अशी मागणी व्यापाऱ्यांकडून केली जात आहे.

पीठ निर्यातीत २६७ टक्के वाढ

देशात गव्हाचा साठा आणि उत्पादन अधिक आहे. त्यामुळे केंद्र सरकारने सुरुवातीला मोठ्या प्रमाणावर निर्यातीला परवानगी दिली. या माध्यमातून विक्रमी ७० लाख टन गव्हाची निर्यात करण्यात आली. एप्रिल महिन्यात ९५.६७ टन पीठ (आटा) निर्यात करण्यात आले. एप्रिल २०२१ मध्ये ही निर्यात केवळ २६००० टन होती. पीठ निर्यातीत गेल्या वर्षीच्या तुलनेत २६७ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे.

दहा प्रमुख गहू निर्यातदार देश (टक्केवारी)

रशिया...१७.६२

अमेरिका...१४.०७

कॅनडा...१४.०२

फ्रान्स...१०.१

युक्रेन...८.०

ऑस्ट्रेलिया...६.०८

अर्जेंटिना...४.७१

जर्मनी...४.६८

कजाकिस्तान...२.५३

पोलंड...२.५३

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT