Soybean Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Market : अकोल्यात ‘नाफेड’कडून पाच हजार क्विंटल सोयाबीन खरेदी

Soybean Procurement : नाफेडच्या केंद्रांवर सोयाबीन विक्रीसाठी साडे अकरा हजारांवर शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून आतापर्यंत सुमारे पाऊणे तीनशे शेतकऱ्यांचे पाच हजार क्विंटल सोयाबीन या केंद्रांवर खरेदी झाले आहे.

Team Agrowon

Akola News : बाजारपेठेत सोयाबीनचा दर हमीभावाच्या आत आहे. त्यामुळे शासकीय खरेदी सुरू करण्यात आली आहे. नाफेडच्या केंद्रांवर सोयाबीन विक्रीसाठी साडे अकरा हजारांवर शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून आतापर्यंत सुमारे पाऊणे तीनशे शेतकऱ्यांचे पाच हजार क्विंटल सोयाबीन या केंद्रांवर खरेदी झाले आहे. प्रामुख्याने बाळापूर तालुक्यातच या खरेदीला समाधानकारक प्रतिसाद मिळालेला आहे.

केंद्र शासनाच्या आधारभूर किमतीने सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी करण्यात आलेली आहे. जिल्ह्यात आजवर १२ खरेदी केंद्रांपैकी चारच केंद्रांवर सोयाबीनची आवक झाली आहे. त्या ठिकाणी मिळून पाच हजार १५६ क्विंटल सोयाबीन खरेदीची माहिती मिळाली आहे.

या १२ केंद्रांवर ११ हजार ७६३ शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे. ही खरेदी सुरू होऊन आता महिना लोटत आहे. या काळात जिल्ह्यात अंदुरा केंद्रावर १०९ शेतकऱ्यांचे २१३७ क्विंटर, पारस केंद्रावर १५५ शेतकऱ्यांचे २९०४ क्विंटल सोयाबीन खरेदी झाले आहे. याशिवाय आलेगाव ९७, उगवा १० क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली.

उर्वरित केंद्रांना सोयाबीन आवकेची प्रतीक्षा आहे. शासकीय खरेदीसाठी ओलसर माल स्वीकारला जात नाही. विशिष्ट मर्यादेपर्यंत मालात आर्द्रता हवी असते. गेल्या काळात सोयाबीनमध्ये मोठ्या प्रमाणात आर्द्रता असल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीन थेट बाजारात विक्री केले आहे.

आता सोयाबीनमध्ये आर्द्रता कमी होत असून विधानसभा निवडणुकीनंतर हे सोयाबीन शासकीय खरेदी केंद्रांवर विक्रीसाठी येईल, अशी अपेक्षा केंद्र संचालक बाळगत आहेत. जिल्ह्यात काही ठिकाणी शेतकरी कंपन्यांनी केंद्रे उघडलेली आहेत. त्यांनाही मालाची प्रतीक्षा आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

151 Years Of IMD: हवामान आधारित कृषी सल्ल्याद्वारे शेतकरी सेवेत ‘आयएमडी’

Chickpea Prices Crash: पीक काढणीपूर्वीच हरभऱ्याचे भाव घसरले; शेतकऱ्यांनी जगायचे कसे?; केंद्राच्या हस्तक्षेपाची सिद्धरामय्यांची मागणी

Farm Roads: कोल्हापुरातील १७७ गावांतील शिवार रस्त्यांचे भाग्य उजळणार

Agrowon Podcast: सोयाबीन दरात सुधारणा, कापूस दर स्थिर, काकडीचे दर टिकून,कोथिंबीर दबावातच,कांदा दरात चढ उतार

Agriculture Irrigation: वाकुर्डे बुद्रुक उपसा सिंचन योजनेचे पहिले आवर्तन सुरू

SCROLL FOR NEXT