Banana Cultivation Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Banana Cultivation : खानदेशात केळी कंदांचे दर घसरले

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : खानदेशात केळीची लागवड यंदा वाढली आहे. कंदांसह रोपांना मोठी मागणी आहे. यातच अनेकांनी लागवड उरकली आहे. रोपांचा पुरवठादेखील करून घेतला आहे. सध्या कंदांचा पुरवठा अधिक व लागवडीचे कामकाजे बंद अशी स्थिती असल्याने कंदांचे दर घसरले असून, ग्रॅण्ड नैन वाणाच्या उतिसंवर्धित (टिश्यू) रोपांच्या केळी बागांमधील कंदांचे दर प्रतिकंद तीन रुपयांपर्यंत आहेत.

ग्रॅण्ड नैन वाणाच्या उतिसंवर्धित (टिश्यू) रोपांच्या केळी बागांमधील कंदांना खानदेशात कांदेबाग केळी लागवडीसाठी मोठी मागणी होती. ही मागणी मागील आठवड्यातही बऱ्यापैकी होती. परंतु या आठवड्यात कंदांचे दर घसरले आहेत. प्रतिकूल स्थिती, पाऊस, केळी लागवडीबाबत शेतकऱ्यांनी पुढे ढकललेले नियोजन व कंदांचा अधिकचा पुरवठा यामुळे दरात घसरण झाली आहे.

मागील पंधरवड्यात ग्रॅण्ड नैन वाणाच्या उतिसंवर्धित रोपांच्या केळी बागांमधील कंदांचे दर प्रतिकंद चार ते पाच रुपये असे होते. यात केळी कंद काढण्याची मजुरी व शेतकऱ्याने कंद वाहतुकीसाठी आणलेल्या वाहनात कंद भरून देण्याची जबाबदारी कंद मालकाकडे होती. परंतु मागील चार ते पाच दिवसांत ग्रॅण्ड नैन वाणाच्या उतिसंवर्धित रोपांच्या केळी बागांमधील कंदांचे दर घसरले आहेत.

अनेक कंद मालक किंवा पुरवठादार शेतकरी प्रतिकंद तीन रुपये दर घेऊ लागले आहेत. तर काही शेतकरी अडीच रुपये प्रतिकंद असे दर घेण्याची तयारीदेखील दाखवित आहेत. कांदेबाग केळी लागवडीचा काळ हा सप्टेंबर, ऑक्टोबर या महिन्यात अनुकूल मानला जातो. नोव्हेंबरमध्ये उशिराच्या बागांची लागवड केली जाते.

परंतु पावसामुळे लागवड रखडली. १० ते १२ दिवस लागवडीला उशिर होईल, हे लक्षात घेऊन अनेक शेतकऱ्यांनी केळीची लागवड टाळण्याचे निश्चित केले आहे. अनेक शेतकरी आता फेब्रुवारी व मार्च महिन्यात केळी बागांची लागवड करतील, असेही दिसत आहे.

कंदांची जाहीरात वेगात

तूर्त केळी लागवड कमी करण्याचे किंवा पुढे करण्याचे नियोजन शेतकऱ्यांनी करताच कंद पुरवठादार, एजंट, कंद मालकांनी सोशल मीडियात आपल्या कंदांचे दर व इतर माहितीची जाहिरात प्रसारित करण्यास सुरुवात केली आहे.

ग्रॅण्ड नैन वाणाच्या उतिसंवर्धित रोपांच्या केळी बागांमधील कंदांचे दर कमी दरात व वेळेत दिले जातील, आपली आगाऊ नोंदणी करून घ्या, असे संदेश सोशल मीडियात मागील दोन दिवसांपासून फिरू लागले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

Heavy Rain : आभाळ फाटले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

Sugar Factory Repayment : आमची राखीव थकहमी द्या

Fruit Crop Insurance : फळपीक विमा योजनेत नियमबाह्य सहभागाबाबत कारवाईसत्र

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

SCROLL FOR NEXT