Sugar Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Sugar Market : कोटा घटविल्याने दसऱ्याला साखरेच्या दरात वाढ शक्य

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News : केंद्राने ऑक्टोबर महिन्यासाठी देशातील कारखान्यांना स्थानिक विक्रीसाठी २५.५ लाख टनांचा साखर कोटा दिला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल साडेतीन लाख टनांचा विक्री कोटा कमी दिल्याने दसरा, दिवाळीच्या दरम्यान साखरेच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. दसरा दिवाळीसाठीची खरेदी येत्या काही दिवसांत सुरू होणार आहे.

गेल्या वर्षी केंद्राने ऑक्टोबरसाठी दोन टप्प्यांत कोटा दिला होता. पहिल्या टप्प्यात २८, तर दुसऱ्या टप्प्यात १ लाख टन साखरेचा कोटा केंद्राने दिला होता. सध्या साखरेला मागणी नाही. गेल्या वर्षीपेक्षा यंदा स्थानिक बाजारात साखरेला सरासरी १०० ते २०० रुपयांनी दर कमीच आहे. गणेशोत्सवाच्या दरम्यान साखरेच्या दरात अल्प वाढ झाली.

मध्यंतरी एमएसपी वाढीबाबत सातत्याने चर्चा झाल्या. यामुळे बाजारात काही प्रमाणात तेजी आली. सरकारने इथेनॉल वरील निर्बंध उठवले. इतर अनेक काही निर्णय घेऊन साखर उद्योगाला दिलासा देण्याचा प्रयत्न केला. पण महत्त्वाची असणारी साखरेचा किमान विक्री दर वाढविण्याची मागणी अद्याप मान्य केली नाही. सरकार सकारात्मक असले तरी नेमका निर्णय कधी नाही याचा अंदाज केंद्राने अद्याप साखर उद्योगाला दिला नाही. या पार्श्‍वभूमीवर सध्या तरी साखर बाजार स्थिर आहे.

साखर कारखाने हंगाम सुरू करण्याच्या तयारीत आहेत. तथापि, सप्टेंबर २०२४ मध्ये महाराष्ट्र आणि देशभरात सततच्या पावसामुळे कारखान्यांच्या स्तरावर साखरेची मर्यादित विक्री झाली आहे. त्यामुळे साखर साठा वाढला आहे. परिणामी, सरकारने ऑक्टोबर २०२४ साठी मासिक साखर कोटा कमी करावा अशी मागणी साखर उद्योगाने अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाकडे केली होती.

कोट्यात कपात केल्यानंतर मात्र येत्या पंधरा दिवसांत साखरेचे दर चांगले वाढतील अशी शक्यता आहे. मर्यादित कोटे असल्याने अतिरिक्त साखर बाहेर आल्याने दर समाधानकारक राहतील असा अंदाज साखर उद्योगातील सूत्रांचा आहे. दिवाळीमुळे स्थानिक बरोबर बाहेरील राज्यातूनही मागणी चांगली येण्याची शक्यता असल्याने पुढील हंगाम सुरू होण्याच्या पार्श्‍वभूमीवर जर साखरेला चांगला दर मिळाल्यास याचा फायदा येणाऱ्या हंगामातील बिले वेळेत मिळण्यासाठी होऊ शकतो.

कमी कोटा जाहीर झाल्यानंतर साखरेच्या बाजारात तेजीच्या वातावरणाची शक्यता निर्माण झाली. अजून मागणी नसली तरी साखर दर वाढीचा आलेख या महिन्यात तरी कायम राहील, अशी शक्यता आहे.

मुख्यत्वे करून उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील बाजारपेठांमध्ये साखरेचे दर वाढण्याची चिन्हे आहेत. सध्या ३५०० ते ३६५० रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान साखरेचे सरासरी दर आहेत. शहरानुसार दरामध्ये काहीशी चढउतार आहे. कोटे मर्यादित दिल्याने यात वाढ होण्याची शक्यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : अकोल्यात ऑगस्ट-सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे ५७ हजार हेक्टर बाधित

Rabi Season 2024 : रब्बी हंगामासाठी बियाणे विक्रीसाठी सुरू

Bamboo Farming : शेतकऱ्यांनी बांबूलागवड केल्यास चांगले उत्पन्न मिळेल

Paddy Disease : भात पिकावर करपा, तांबेराचा प्रादुर्भाव

Kalamana APMC : संत्रा-मोसंबीवरील काट पद्धत अखेर कळमना बाजारात बंद

SCROLL FOR NEXT