MSP Of Sugar : 'केंद्र सरकारकडून साखरेच्या किमान विक्री मूल्यात वाढ करण्याची शक्यता'

Central Government : केंद्र सरकारकडून साखरेच्या किमान विक्री मुल्यात वाढ करण्याच्या हालचाली सुरू आहेत. या संदर्भात साखर कारखाने आणि इतर मंत्रालयाशी चर्चा सुरू आहे.
msp on sugar
msp on sugarAgrowon
Published on
Updated on

MSP Of Sugar Central Government : केंद्र सरकारकडून साखरेच्या किमान विक्री मुल्यात वाढ करण्याच्या हालचाली सुरू आहेत. परंतु या संदर्भात नेमका निर्णय कधी घेतला जाईल याबाबत कोणताही खुलासा करण्यात आला नाही. अशी माहिती केंद्रीय अन्न मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिल्ली येथे एका कार्यक्रमानंतर दिली आहे. ते आज शुक्रवार (ता. २७) पत्रकारांना माहिती दिली.

जोशी म्हणाले की, "सरकार साखरेची किमान विक्री किंमत वाढविण्याच्या शक्यतेवर विचार करीत आहे. या संदर्भात साखर कारखाने आणि इतर मंत्रालयाशी चर्चा चालू आहे. मात्र हा निर्णय कधी घेतला जाईल, याबद्दल त्यांनी माध्यमांना सांगण्यास नकार दिला. केंद्र सरकारने यापूर्वी साखरेचे किमान विक्री मूल्य फेब्रुवारी २०१९ मध्ये ३१ रुपये प्रति किलो ठरविले होते".

ऑक्टोबरचा साखर कोटा कमी करण्याची मागणी

यंदाचा उसाचा गाळप हंगाम १५ नोव्हेंबरपासून सुरू होणार असल्याची घोषणा करण्यात आली. साखर कारखाने हंगाम सुरू करण्याच्या तयारीत आहेत. परंतु सप्टेंबर २०२४ मध्ये महाराष्ट्र आणि देशभरात सततच्या पावसामुळे कारखान्यांकडून साखरेची मर्यादित विक्री झाली आहे. त्यामुळे साखर साठा वाढला आहे.

यामुळे या महिन्याचां ऑक्टोबर २०२४ साठीचा मासिक साखर कोटा केंद्र सरकारने कमी करावा अशी मागणी साखर उद्योगातील काही मंडळींनी केली आहे. सरकारने ऑक्टोबरसाठी साखरेचा अधिक कोटा दिल्यास कारखान्यांच्या अर्थकारणावर परिणाम होऊ शकतो, असे कारखानदारांचे म्हणणे आहे.

msp on sugar
Sugar Ordinance : साखर अध्यादेश धोरणात्मक बदलात शेतकरी बेदखल, राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे मागणी

उसाचे उत्पादन घटण्याची शक्यता

मागील वर्षीच्या तुलनेत साखर उत्पादनात मोठी घट होण्याचा अंदाज सहकार विभागाने व्यक्त केला आहे. यंदा महापूर आणि अतिवृष्टीमुळे नदीकाठच्या ऊस क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे त्याचा परिणाम साखर उताऱ्यावर होण्याची शक्यता आहे. गळीत हंगाम १५ नोव्हेंबरपासून सुरू होणार असला, तरी हंगामावर निवडणुकीचे सावट असल्याने प्रत्यक्षात हंगाम नोव्हेंबर अखेर सुरू होण्याची शक्यता आहे.

केंद्रीय कृषी विभाग आणि मिटकॉनच्या अंदाजानुसार हेच उत्पादन ९० आणि १०२ लाख टन होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यंदाच्या हंगामात राज्यात होणाऱ्या ऊस उत्पादनात कृषी विभाग आणि मिटकॉनच्या अंदाजात २३१ लाख टनांचा फरक आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com