Lemon Rate Hike Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Lemon Market Price : लिंबाच्या दराने घेतली सहा हजारांपर्यंत भरारी

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Amaravati News : तापमानात होणारी वाढ, त्या पार्श्‍वभूमीवर वाढती मागणी आणि तुलनेत कमी आवक या कारणांमुळे राज्यात लिंबू दरात तेजी अनुभवली जात आहे. सध्या लिंबाला ४ हजार ते ६ हजार रुपयांचा दर मिळत आहे. येत्या काळात हे दर १० हजार रुपये क्‍विंटलवर पोचतील, अशी शक्‍यता बाजार विश्‍लेषकांनी वर्तविली आहे.

नागपूरच्या कळमना बाजार समितीत जानेवारीच्या सुरवातीला लिंबाचे दर २००० ते २५०० रुपयांवर होते. त्यावेळी आवक अवघी २५ क्‍विंटलची होती. हस्त व आंबिया बहारातील लिंबाची उपलब्धता फेब्रुवारीअखेर ते मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होत एप्रिल, मे या कालावधीपर्यंत लिंबे मिळतात.

यावर्षी मात्र वातावरणातील बदलाचा फटका बसत लिंबाचा हस्त आणि आंबिया बहार प्रभावित झाला आहे. त्यामुळे यंदा लिंबाची उपलब्धता एप्रिल, मे, जून या कालावधीत होईल, अशी शक्‍यता आहे. त्यामुळेच सध्या बाजारात लिंबाची आवक सातत्याने कमी होत असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे उन्हाचा पारा वाढत असल्याने मागणी वाढत दरातही तेजी येत असल्याची स्थिती आहे.

अकरा जानेवारी रोजी कळमना बाजारात अवघ्या ११ क्‍विंटलची उपलब्धता झाली. त्यामुळे दर ३००० ते ४००० रुपयांपर्यंत पोचले. त्यानंतर आवक ६० क्‍विंटल झाली असताना दर ३००० ते ३५०० रुपयांवर आले. हा दर स्थिर असताना आता मात्र लिंबाच्या दराने मोठी भरारी घेत ४००० ते ६००० रुपयांचा टप्पा पार केला आहे.

याचवेळी आवक मात्र २० क्‍विंटल होत असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. आवक कमी राहिल्यास येत्या काळात लिंबू उत्पादकांना दहा हजार रुपये क्‍विंटलपर्यंतचा दर मिळेल, असा विश्‍वास लिंबू बागायतदार अंकुश झंझाट यांनी व्यक्‍त केला.

माहुलीत (चोर) २५० हेक्‍टरवर लिंबू बागा

एकट्या माहुली (चोर) परिसरात २५० हेक्‍टरवर लिंबू बागा आहेत. त्यानंतर वाडेगाव, बाळापूर, पातूर (अकोला) या ठिकाणी लिंबू होतो. नागपूरच्या काटोल, परतवाडा या परिसरात संत्रा बागेत लिंबू घेण्याचा ट्रेंड आहे.

हस्त आणि आंबिया बहाराचा हंगाम वातावरणातील बदलामुळे लांबला. त्यामुळे आवक कमी झाल्याने दर सहा हजार रुपये क्‍विंटलपर्यंत गेले आहेत. येत्या काळात १० हजार रुपये क्‍विंटलचा दर उत्पादकांना मिळेल. गेल्या हंगामात हे दर चार ते पाच हजार रुपयांपर्यंत होते.
-अंकुश झंझाट, लिंबू बागायतदार, माहुली (चोर), नांदगांव खंडेश्‍वर, जि. अमरावती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT