Lemon Market : लिंबांचे दर तेजीत

Lemon Rate : सुरुवातीला कमी आणि त्यानंतर संततधार पावसाचा फटका बसल्याने लिंबाची उत्पादकता कमी झाली. परिणामी, बाजारात लिंबाची आवक कमी आहे.
Lemon Market
Lemon MarketAgrowon
Published on
Updated on

Amaravati News : सुरुवातीला कमी आणि त्यानंतर संततधार पावसाचा फटका बसल्याने लिंबाची उत्पादकता कमी झाली. परिणामी, बाजारात लिंबाची आवक कमी आहे. त्यामुळे दर तेजीत आले असून, सध्या कळमना बाजारात लिंबाला ३५०० ते ४००० रुपये क्‍विंटल दर मिळत आहे.

पावसाळ्यानंतर थंडीला सुरुवात होते. मात्र मधल्या काळात तापमानात वाढ होत असल्याने लिंबाची मागणी वाढते. दरवर्षी मृग बहराची उत्पादकता चांगली होत असल्याने बाजारात मागणीच्या तुलनेत पुरवठा अधिक अशी स्थिती राहते. त्याचा दरावर परिणाम होत ते सरासरी २००० ते ३००० रुपये क्‍विंटल याप्रमाणे राहतात.

Lemon Market
Lemon Cutting Machine : लिंबाचे काप करणारे यंत्र

सद्यःस्थितीत दिल्लीत ५००० ते ७००० रुपये क्‍विंटलचा दर आहे. नागपूरच्या कळमना बाजारात लिंबू आवक अवघी १५ ते २० क्‍विंटल आहे. त्यामुळेच दर तेजीत आहेत. अमरावतीच्या फळ व भाजीपाला बाजार समितीत लिंबू आवक १० क्‍विंटल राहिली. ठिकाणी दर १८०० ते २००० रुपये इतके आहेत. पुढील काळात उन्हाची तीव्रता वाढल्यानंतर हे दर वाढतील, अशी अपेक्षा व्यापारी सूत्रांकडून वर्तविली जात आहे.

वाडेगाव ( अकोला), माउली (चोर (अमरावती), श्रीगोंदा (नगर), विजापूर (कर्नाटक) या भागांत लिंबू बागा आहेत. त्याच भागातून लिंबाचा पुरवठा होतो. दरम्यान, लिंबू पुरवठादार अंकुश झंझाट म्हणाले, ‘‘हस्त बहरातील फळे मार्च ते जून या कालावधीत मिळतात. या हंगामातील फळांना सर्वाधिक दर मिळतो.

Lemon Market
Lemon Grading Machine : लिंबू प्रतवारीसाठी हस्तचलित यंत्र

कारण या हंगामातील फळांची उपलब्धता उन्हाळ्यात होते. सरासरी १० हजार रुपये क्‍विंटलपर्यंत दर राहतो. गेल्या हंगामात १५ हजार रुपये क्‍विंटलचा दर मिळाला. या हंगामातील नियोजन करताना १५ नोव्हेंबरपासून बाग फुलधारणेवर येते; त्यानुसार बागेचे व्यवस्थापन करावे लागते. मृगातील फळांना कमी दर मिळतो. यंदा मात्र उत्पादकतेच्या परिणामी या हंगामातील फळांचे दरही तेजीत आले आहेत.

जूनमध्ये पाऊस होता. त्याचा मृग बहरावर परिणाम झाला. या बहारातील फळे ऑक्‍टोबर, नोव्हेंबर काढणीस येतात. परंतु हा बहरच प्रभावित झाल्याने मालधारणा कमी झाली. दुसरीकडे उन्हाची तीव्रता वाढल्याने दरात तेजी आली आहे. मी दिल्ली बाजारात माझ्यासह इतर शेतकऱ्यांचा लिंबू पाठवतो. सध्या ५००० ते ७००० रुपये क्‍विंटलचा दर दिल्लीत मिळत आहे.
- अंकुश झंझाट, लिंबू उत्पादक, माऊली चोर, नांदगाव खंडेश्‍वर, अमरावती

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com