Banana Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Banana Market : केळी दर टिकून

Banana Rate : खानदेशात काही दिवसांपासून केळी दर टिकून आहेत.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात काही दिवसांपासून केळी दर टिकून आहेत. या आठवड्यात आवक वाढली असून, दर प्रतिक्विंटल ६०० ते ७०० व कमाल १३००, १५५० ते १८५० रुपये, असे आहेत.

तीन ते चार प्रकारचे दर केळीला मिळत आहेत. निर्यातीच्या केळीला १९०० ते २००० रुपये प्रतिक्विंटलचा दर आहे. जुनारी केळी बागांमधील (काढणी ९० ते ०५ टक्के पूर्ण झालेल्या बागा) केळीचे दर ६०० ते ७०० रुपये प्रतिक्विंटल आहेत.

सध्या केळीची खानदेशात १७० ते १७५ ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) केळीची आवक होत आहे. रावेर, यावल, मुक्ताईनगर भागात पिलबाग किंवा खोडवा केळी बागांमध्ये आवक सुरू झाली आहे. तसेच जळगाव, चोपडा, जामनेर, पाचोरा-भडगाव, धुळ्यातील शिरपूर भागात कांदेबाग केळी बागांमधून (मागील वर्षी सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये लागवडीच्या बागा) केळीची आवक सुरू झाली आहे.

मागील पंधरवड्यात आगाप कांदेबाग केळीमधून आवक सुरू होती. आता हंगामातील बागांमधूनही आवक सुरू झाली आहे. रावेर, यावलच्या तुलनेत सध्या चोपडा, जामनेर, शिरपूर, जळगाव भागातून केळीची आवक अधिक आहे.

दर्जेदार केळी या भागात उपलब्ध होत आहे. काश्मिरात पाठवणुकीच्या केळीला १९०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंतचा दर मिळत आहे. तसेच पंजाब, दिल्ली येथेही केळीची पाठवणूक सुरू आहे. उत्तर भारतात रोज १५० ते १५५ ट्रक केळीची पाठवणूक खानदेशातून सुरू आहे.

सध्या नंदुरबारमधील शहादा, तळोदा, अक्कलकुवा या भागात केळीची फारशी आवक नाही. कारण या भागात मृग बहरातील केळीची लागवड अधिक असते. पिलबाग केळीही या भागात फारशी नसते.

केळीची आवक मागील १० ते १२ दिवसांत सतत वाढली आहे. जुलैमध्ये आवक अत्यल्प होती. ऑगस्टच्या मध्यापासून आवक वाढू लागली. ऑगस्टच्या सुरवातीच्या तुलनेत सध्याची आवक ३० ते ३५ टक्क्यांनी वाढली आहे. परंतु केळीला उठाव असल्याने दर टिकून आहेत.

आवक आणखी वाढणार

राज्यात नवी मुंबई, ठाणे, कल्याण, नागपूर तसेच छत्तीसगड, राजस्थान या भागातही केळीची पाठवणूक खानेदशातून होत आहे. केळीची आवक पुढील आठवड्यात आणखी वाढेल. कारण पावसामुळे केळी पक्व होण्याची क्रिया गती घेईल. पुढेही दर्जेदार केळी चोपडा, जळगाव, जामनेर, शिरपूर, पाचोरा, भडगाव या भागात उपलब्ध होईल, अशी माहिती मिळाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election : शेतकरी संघटनांना भुलवतेय आमदारकीची मोहमाया

Maharashtra Assembly Election : पुणे जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाची ससेहोलपट

Sanjay Kulkarni Death : ‘जलसंपदा’ला दिशा देणारे संजय कुलकर्णी यांचे निधन

Rabi Crop Loan : रब्बीसाठी पीक कर्जाचे ६८५ कोटींचे उद्दिष्ट

Maharashtra Weather : मध्य महाराष्ट्रात थंडीची चाहूल

SCROLL FOR NEXT