Maize Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Maize Market : मका भावाला पोल्ट्री, इथेनॉलचा टेकू

Maize Rate : दुष्काळामुळे मक्यासह इतर धान्याचे घटलेले उत्पादन, इथेनॉलसाठी वाढती मागणी आणि पशुखाद्यासाठीचा उठाव यामुळे मका बाजाराचे समीकरण बदलले.

अनिल जाधव

Pune News : दुष्काळामुळे मक्यासह इतर धान्याचे घटलेले उत्पादन, इथेनॉलसाठी वाढती मागणी आणि पशुखाद्यासाठीचा उठाव यामुळे मका बाजाराचे समीकरण बदलले. मक्याचे भाव देशभरातील बाजारात आता हमीभावापेक्षा अधिक आहेत. पुढील काळात मक्याचा उठाव आणखी वाढून भावही सुधारू शकतो, अशी स्थिती सध्या आहे.

मक्याच्या भावात ऑक्टोबरपासून २० टक्क्यांची वाढ झाली. देशातील मक्याचा भाव पाहीला तर सध्या २२०० ते २४०० रुपयांच्या दरम्यान आहे. महाराष्ट्रातील भावपातळी २१०० ते २३०० रुपयांच्या दरम्यान आहे. केंद्र सरकारने यंदा मक्याला २०९० रुपये हमीभाव जाहीर केला.

खरिपातील नवा माल बाजारात आला त्या वेळी असलेला भाव आणि आताचा भाव यात जवळपास ३०० ते ४०० रुपयांचा फरक दिसतो. खरिपातील घटलेले उत्पादन, सरकारने हमीभावाने खरेदीचा घेतलेला निर्णय आणि तेल कंपन्यांनी मक्यापासून तयार केलेल्या इथेनॉलच्या दरात केलेली वाढ यामुळे बाजारातील समीकरण बदलले आहे.

पोल्ट्रीकडून चांगला उठाव

मक्याचा मुख्य ग्राहक पशुखाद्य उद्योग आहे. त्यातही पोल्ट्रीमध्ये मक्याचा मोठा वापर होतो. सध्याची परिस्थिती पाहिली तर सध्या अंड्याचे भाव शेकडा ५५० ते ६५० रुपयांच्या दरम्यान आहेत. पोल्ट्रीचे भावही ८० ते ८५ रुपयांच्या दरम्यान आहेत. त्यामुळे पोल्ट्री उद्योगाकडून मक्याला उठावही चांगला आहे.

सध्या पोल्ट्रीला इतर धान्य मिळण्यात अडचणी येत आहेत. त्यातच भावही जास्त आहेत. याचा फायदा मक्याला होऊ शकतो. सध्या सोयापेंड स्वस्त दिसते. पण पुढील काळात सोयापेंडचे भाव वाढू शकतात. यामुळे मक्याचा वापर वाढू शकतो, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

इथेनॉलसाठी मक्याचा पर्याय

मक्याला इथेनॉलसाठी मागणी वाढत आहे. यंदा देशातील ऊस उत्पादन घटल्याने साखरनिर्मितीवर परिणाम झाला. त्यामुळे सरकारने थेट उसाच्या रसापासून आणि साखरेपासून इथेनॉल निर्मितीवर बंधने घातली. यामुळे इथेनॉल उद्योगाचा भर धान्यापासून इथेनॉल निर्मितीवर आहे.

पण गहू, तांदूळ, ज्वारी ही धान्य पिके यंदा इथेनॉलसाठी उपलब्ध होणार नाहीत. त्यामुळे इथेनॉल उद्योगाचा भर मक्यावरच आहे. मक्यापासून इथेनॉल निर्मिती वाढावी यासाठी तेल कंपन्यांनी लिटरमागे ५.७० रुपयांची वाढ केली. म्हणजेच मक्यापासून निर्मिती केलेल्या इथेनॉलला आता ७१.८६ रुपये भाव मिळणार आहे.

उद्योगांचे लॉबिंग सुरू

- मक्याला पशुखाद्य, स्टार्च निर्मिती आणि इथेनॉल निर्मितीसाठी मागणी

- यंदा दुष्काळ, पावसातील खंडामुळे उत्पादन कमीच

- गहू, तांदूळ आणि इतर धान्य पिकांचा पुरवठा कमी असून भावही जास्त

- उद्योगांकडे मक्याशिवाय फारसा पर्याय उपलब्ध नाही

- पशुखाद्य, पोल्ट्री उद्योगाकडून मका आयातीची मागणी

- सरकारकडून आयातीच्या मागणीवर विचार नाही

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Krushi Anudan: नांदेडमध्ये कृषी यांत्रिकीकरणातून १२.७० कोटींचे अनुदान वितरित

Raju Shetti: बोगस आणि निकृष्ट खते, कीडनाशकांमुळे आंबा, काजू उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान, राजू शेट्टींकडून कारवाईची मागणी

Maharashtra Khat Satha: खरिपासाठी १.५० लाख टन युरिया, २५ हजार टन डीएपीचा संरक्षित साठा

Pani Tanchai Upay: पाणी टंचाईवर मात करत पेणच्या शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग

Bhat Sheti in Maharashtra: सूर्या प्रकल्पामुळे उन्हाळी भातशेती बहरली

SCROLL FOR NEXT