Maize Market : मध्य प्रदेशातील मक्‍याची राज्यातील बाजारांत आवक

Maize Rate : भावांतर योजना बंद झाल्याच्या परिणामी मध्य प्रदेशातील बाजार समित्यांमध्ये मक्‍याला अपेक्षित दर मिळत नसल्यामुळे महाराष्ट्र सीमेलगत असलेल्या बाजार समित्यांमध्ये मध्य प्रदेशातून मका आवक होत आहे.
Maize Market
Maize MarketAgrowon
Published on
Updated on

विनोद इंगोले ः ॲग्रोवन वृत्तसेवा
Maize News : अमरावती ः भावांतर योजना बंद झाल्याच्या परिणामी मध्य प्रदेशातील बाजार समित्यांमध्ये मक्‍याला अपेक्षित दर मिळत नसल्यामुळे महाराष्ट्र सीमेलगत असलेल्या बाजार समित्यांमध्ये मध्य प्रदेशातून मका आवक होत आहे. चांदूर बाजार समितीत यंदाच्या हंगामात ४५ हजार क्‍विंटल मका आवक झाल्याची माहिती सचिव मनीष भारंबे यांनी दिली.

सोयाबीनची उत्पादकता सातत्याने कमी होत असल्याच्या परिणामी मध्य प्रदेशात चारा आणि धान्य अशा दोन्ही पर्यायांकरिता मका लागवडीवर भर दिला जात आहे. त्यातच यंदा मध्य प्रदेशात भावांतर योजना लागू नाही. त्यामुळे मक्‍याचे दर महाराष्ट्राच्या तुलनेत दबावात आले आहेत. त्यामुळेच त्या भागातील मका उत्पादक आपला मका विक्रीसाठी राज्याच्या सीमेवर असलेल्या अचलपूर, चांदूरबाजार, मोर्शी या बाजार समित्यांमध्ये विक्रीसाठी आणत आहेत.

त्यामुळेच या बाजार समित्यांमध्ये यंदा मका आवक वाढली आहे. एकट्या चांदूरबाजार समितीत आजवर ४५ हजार क्‍विंटल मका आवक झाली आहे. मका हमीभाव २०९० रुपये क्‍विंटल असताना चांदूर बाजार बाजार समितीत चांगल्या प्रतीच्या मक्‍याला २१५० रुपयांचा दर मिळत आहे. नॉन फेअर दर्जाच्या मक्‍याला १९०० ते २००० रुपयांचा दर मिळत असल्याची माहिती सचिव भारंबे यांनी दिली.

Maize Market
Maize Market : खानदेशातील बाजारांत मक्याची आवक घटली

रोख परतावा मिळत असल्याने मध्य प्रदेशातून मका आवक सर्वाधिक होत आहे. बैतुल जिल्ह्यातील भैसदेही तालुक्‍यातून सर्वाधिक आवक आहे. एकरी २० ते २५ क्‍विंटल मका उत्पादनाबरोबरच चाऱ्याची उपलब्धता होते. त्यामुळे मध्य प्रदेशात सोयाबीनऐवजी मक्‍याला पसंती मिळत असल्याचे चित्र आहे.

सप्टेंबरअखेरपासून ते डिसेंबरअखेरपर्यंत आवक होते. एका दिवशी पाच ते सहा हजार क्‍विंटलपर्यंतची आवक नोंदविली गेली. मका काढणीनंतर त्या भागातील शेतकरी गव्हाची लागवड करतात.
- मनीष भारंबे, सचिव, बाजार समिती, चांदूरबाजार, अमरावती.

अशी आहे वार्षिक आवक
२०२१-२२ ः ३२ हजार क्‍विंटल
२०२२-२३ ः १६ हजार क्‍विंटल
२०२३-२४ ः ४७ हजार क्‍विंटल

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com