Market Committee  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Potato Tomato Rate : नगरमध्ये बटाटे टोमॅटो हिरव्या मिरचीला मागणी

नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटो, बटाटे, हिरव्या मिरचीला मागील आठवड्यात चांगली मागणी राहिली आहे.

Team Agrowon

नगर : नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत (Market Committee) टोमॅटो, बटाटे, हिरव्या मिरचीला मागील आठवड्यात चांगली मागणी राहिली आहे. मात्र मागील आठवड्यात भाजीपाल्याच्या आवके सातत्याने चढउतार होत होता. कांद्याच्या दरातही काही प्रमाणात घसरण झाल्याचे पाहायला मिळाले.

नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दर दिवसाला साधारण १४०० ते १५०० क्विंटलपर्यंत भाजीपाल्याचे आवक होते. मागील आठवड्यात दर दिवसाला ८०० ते १००० क्विंटलपर्यंत आवक झाल्याचे पाहायला मिळाले. टोमॅटोची दर दिवसाला ७७ क्विंटलपर्यंत आवक होऊन पाचशे ते बावीसशे रुपयाचा प्रतिक्विंटल दर मिळाला.

वांगीची २४ क्विंटलपर्यंत आवक होऊन दीड हजार ते साडेतीन हजार रुपये, फ्लॉवरची ५० क्विंटलपर्यंत आवक होऊन ६०० ते ३५०० दर मिळाला. कोबीची ६० क्विंटलपर्यंत व खून ८०० ते ३५०० रुपये, काकडीचे ४० क्विंटल पर्यंत आवक होऊन १००० ते २५०० रुपये, गवारचे दहा क्विंटलपर्यंत आवक होऊन अडीच हजार ते सात हजार, घोसाळ्याची सात क्विंटलपर्यंत आवक होऊन दीड हजार ते तीन रुपये, दर मिळाला.

कांद्याच्या दरात चढ-उतार

मागील पंधरा दिवसात नगरसह राज्यातील विविध भागात कांद्याच्या दरात बऱ्यापैकी वाढ झालेली होती, मात्र मागील आठवड्यात पुन्हा कांद्याच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. कांदा दर सातत्याने चढउतारात असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हतबल झाल्याचे दिसत आहे.

शनिवारी (ता. १९) कांद्याला २०० ते दोन हजार रुपयापर्यंत दर मिळाला त्यात एक नंबरच्या कांद्याला सोळाशे ते दोन हजार, दोन नंबरच्या कांद्याला १००० ते १६०० रुपये, तीन नंबरच्या कांद्याला सहाशे ते १००० रुपये व चार नंबरच्या कांद्याला २०० ते ६०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला असल्याचे बाजार समितीतून सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agri Equipment Lottery : शेतीपूरक अवजारे, साहित्यासाठी २४५९ लाभार्थ्यांना ‘लॉटरी’

Fake Teachers Scam: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शिक्षण विभागाची धडक कारवाई; बनावट शिक्षकांचा पर्दाफाश होणार?

Warehouse Operator: गोदाम ऑपरेटर हा महत्त्वाचा घटक

Farmer Debt Recovery: शेतकऱ्यांना कर्जवसुलीच्या १९ जिल्ह्यांमध्ये नोटीसा; कर्जमाफीची अजूनही प्रतीक्षा

Washim Jaltara Project : प्रबळ इच्छाशक्तीने सिद्धीस नेला जलतारा प्रकल्प

SCROLL FOR NEXT