Tomato Potato Production Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Potato, Tomato Production : बटाटा, टोमॅटो उत्पादन घटणार

यंदा देशात बटाटा आणि टोमॅटोच्या उत्पादनात चार ते पाच टक्क्यांनी घट होण्याचा अंदाज आहे, तर कांद्याचं उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढण्याची शक्यता आहे.

टीम ॲग्रोवन

यंदा देशात बटाटा आणि टोमॅटोच्या उत्पादनात (Potato, Tomato Production) चार ते पाच टक्क्यांनी घट होण्याचा अंदाज आहे, तर कांद्याचं उत्पादन (Onion Production) गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढण्याची शक्यता आहे. बागायती पिकांच्या उत्पादनाचे अंदाज कृषी मंत्रालयाकडून (Agriculture Department) नुकतेच जाहीर करण्यात आले. या आकडेवारीनुसार, बटाट्याचं उत्पादन २०२१-२२ मध्ये ५ टक्क्यांनी घसरून सुमारे ५ कोटी ३३ लाख टनांवर येईल. मागच्या वर्षी बटाट्याचं उत्पादन सुमारे ५ कोटी ६१ लाख टन इतकं होतं. केंद्र सरकारकडून प्रत्येक पीक वर्षासाठी वेगवेगळ्या वेळी अंदाजाची आकडेवारी जाहीर करण्यात येते.

टोमॅटो उत्पादनात चार टक्के घट

यावेळी टोमॅटोच्या उत्पादनात ४ टक्क्यांनी घट होण्याची शक्यता आहे. यावर्षी टोमॅटोचे उत्पादन सुमारे २ कोटी ३ लाख टन इतकं होण्याची शक्यता आहे. मागच्या वर्षी टोमॅटोचं उत्पादन सुमारे २ कोटी ११ कोटी टन इतकं होतं.

कृषी मंत्रालयाने यावर्षी कांद्याच्या उत्पादनात वाढ दाखवली आहे. यावर्षी सुमारे ३ कोटी १२ लाख टन कांद्याचं उत्पादन होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मागच्या वर्षी सुमारे २ कोटी ६६ लाख टन इतकं उत्पादन झालं होतं.

दुसरीकडे फळं आणि भाजीपाला उत्पादनाबाबत बोलायचं झाल्यास त्यात वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. यावर्षी देशात सुमारे २० कोटी ४८ लाख टन भाजीपाला उत्पादनाचा अंदाज आहे, तर गेल्या वर्षी सुमारे २० कोटी ४ लाख टन उत्पादन झालं होतं. यावर्षी फळांचं उत्पादन सुमारे १० कोटी ७२ लाख टन होण्याचा अंदाज आहे. मागच्या वर्षी फळ उत्पादन सुमारे १० कोटी २४ लाख टन इतकं होतं.

मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील फलोत्पादन पिकांच्या उत्पादनात यावर्षी २.३१ टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT