Pomegranate  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Pomegranate Rate : डाळिंबाचे दर स्थिर

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Sangli News : राज्यातील आंबिया बहरातील दहा टक्के क्षेत्रावरील डाळिंबाची विक्री सुरू आहे. हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या आंबिया बहरात डाळिंबाला प्रतिकिलो २० ते ३० रुपये दर जादा आहेत. सध्या दर्जेदार डाळिंबाला प्रतिकिलो १६० ते १८० रुपये दर आहे. मात्र, डाळिंबाचे दर समाधानकारक असले तरी, ज्या भागात पावसामुळे बागांचे नुकसान झाल्याने डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित काहीसे बिघडले आहे.

राज्यात यंदा ६० ते ७० हजार हेक्टरवर अंबिया बहर धरला. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून नैसर्गिक आपत्तीमुळे या बहरातील डाळिंबाचे नुकसान झाले होते. त्यातच यंदा महाराष्ट्रासह डाळिंब उत्पादन घेणाऱ्या राज्यात पाणी टंचाईचा फटका डाळिंबाला बसला. परिमाणी यंदा अंबिया बहरात ४५ हजार हेक्टर शेतकऱ्यांनी डाळिंब साधले आहे. त्यापैकी ४० हजार हेक्टरवरील डाळिंबाची विक्री पूर्ण झाली आहे. सध्या पाच हजार हेक्टरवरील डाळिंबाची विक्री सुरू आहे.

यंदाच्या हंगामात प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांनी डाळिंब साधले. त्यातच पावसाचा फटका डाळिंबाला बसल्याने पिकाचे नुकसान झाल्याने काही प्रमाणात उत्पादनात घट झाली. या बहरातील डाळिंबाची जूनच्या मध्यापासून विक्री सुरू होते. त्यामुळे बाजारपेठेत डाळिंबाची आवक कमीअधिक प्रमाणात झाली. बाजारात डाळिंबाची आवक कमी आणि मागणी जास्त असल्याने हंगामाच्या प्रारंभापासून डाळिंबाला दर चांगले मिळाले. जुलैमध्ये दर्जेदार डाळिंबाला प्रतिकिलो १२५ ते १३० रुपये दर होता. त्यानंतर डाळिंबाच्या दरात हळूहळू सुधारणा झाली आहे.

जून आणि जुलैमध्ये पुन्हा पावसाचा फटका विक्रीला आलेल्या डाळिंबाला बसला. त्यामुळे तेलकट रोगाचा प्रादुर्भाव वाढला. त्यामुळे बाजारात पुन्हा आवक कमी झाल्याने दरात सुधारणा झाली. ऑगस्ट महिन्यात २५ ते ३० रुपयांनी दर वाढून दर्जेदार डाळिंबाला १५० ते १६० रुपये असा दर मिळाला. सध्या हंगामात आटोपण्याच्या मार्गावर आला आहे. पाच हजार हेक्टरवरील डाळिंबाची विक्री सुरू आहे. हंगाम अंतिम टप्प्याकडे असताना डाळिंबाच्या दरात प्रतिदहा रुपयांची वाढ झाली आहे. दर्जदार डाळिंबाला १६० ते १८० तर दोन नंबरच्या प्रतिला ८० ते ९० रुपये प्रतिकिलो दर आहे.

गतवर्षीच्या तुलनेत यंदा दर समाधानकारक

गतवर्षी आंबिया बहरातील डाळिंबाला १४० ते १५० रुपये असा दर होतात. यंदा गतवर्षीच्या तुलनेत प्रतिकिलोस २० ते ३० रुपयांनी दर जास्त आहेत. त्यामुळे यंदा डाळिंबाला समाधानकारक दर आहेत. डाळिंबाला चांगले दर असले तरी, ज्या भागात अतिपावसाने नुकसान झाले आहे, त्या भागातील डाळिंबाचे उत्पादन कमी आहे. त्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना काहीचा आर्थिक फटका बसला आहे.

गतवर्षीपेक्षा डाळिंबाचे दर बरे असल्याने समाधान आहे. मात्र, ज्या भागात डाळिंबाचे पावसामुळे नुकसान झाले आहे. त्या ठिकाणचे शेतकरी अडचणीत आहेत. आगाप मृग बहरातील डाळिंबाची विक्री काही अंशी सुरू झाली असून या बहरातील डाळिंबालाही चांगले दर आहेत.
प्रभाकर चांदणे, अध्यक्ष, अखिल भारतीय डाळिंब संघ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weekly Weather : राज्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता

Retreating Monsoon : परतीचा पाऊस थांबायचे नावच घेईना

Khandesh Rain : पावसामुळे खानदेशातील प्रमुख नद्या झाल्या प्रवाही

Crop Damage : शिरूरमधील शेतकऱ्यांचे वादळ, पावसामुळे पिकांचे नुकसान

Maharashtra Politics : छत्रपती शिवरायांचे विचार घेऊनच काँग्रेसचा लढा

SCROLL FOR NEXT