Pomegranate Market : गतवर्षीच्या तुलनेत डाळिंबाला चांगले दर

Pomegranate Rate : राज्यातील हस्त बहरातील डाळिंबाची विक्री आटोपली आहे. यावर्षीच्या हंगामात दर्जेदार डाळिंबाला १०० रुपये असा दर मिळाला आहे.
Pomegranate
PomegranateAgrowon

Sangli News : राज्यातील हस्त बहरातील डाळिंबाची विक्री आटोपली आहे. यावर्षीच्या हंगामात दर्जेदार डाळिंबाला १०० रुपये असा दर मिळाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या हस्त बहरातील डाळिंबाला प्रतिकिलो २० रुपये अधिक दर मिळल्याने डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.

मात्र, पाण्याची टंचाई आणि वाढत्या उष्णतेचा फटका डाळिंबाच्या उत्पादनावर झाला असल्याने उत्पादनात सुमारे २० टक्क्यांनी घट झाली आहे. त्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचा आर्थिक ताळमेळ काटोकाट लागला आहे.

राज्यात दरवर्षी हस्त बहरातील डाळिंब ३० हजार हेक्टरवर धरला जातो. मात्र, पाणी टंचाईमुळे या बहरात १० हजार हेक्टरवरील डाळिंब शेतकऱ्यांनी साधले. पाण्याची कमतरता भासू नये यासाठी टॅंकरने विकत घेऊन डाळिंबाच्या बागा जगवल्या. काटेकोर व्यवस्थापन करत बागा फुलवल्या.

जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून डाळिंब विक्रीला येऊ लागली. या दरम्यान, दर्जेदार डाळिंबाला १४० रुपये असा दर होता. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत डाळिंबाचे दर टिकून होते. परंतु बाजारात मागणी कमी झाल्याने डाळिंबाच्या दरात प्रतिकिलो २० रुपयांनी घट झाली होती.

Pomegranate
Pomegranate Orchard Fire : शॅार्टसर्किटमुळे डाळिंब बाग जळाली

फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात डाळिंबाला प्रतिकिलो ८० रुपये असा दर होता. मार्चपासून डाळिंबाची मागणी वाढली, बाजारापेठेत डाळिंबाचा उठावही होऊ लागल्याने दरात तेजी आली. त्यामुळे दरात प्रतिकिलो २० रुपयांनी वाढ झाली. एप्रिलपासून डाळिंबाचे दर टिकून राहिले आहेत. राज्यातील हस्त बहरातील डाळिंबाची विक्री आटोपली आहे.

वास्तविक, गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या हस्त बहरात दर्जेदार डाळिंबाचे दर २० रुपयांनी अधिक होते. तर दोन नंबरच्या डाळिंबाला ६० रुपये आणि तीन नंबरच्या डाळिंबाला ३५ रुपये प्रतिकिलो दर मिळाला.

Pomegranate
Pomegranate Processing : डाळिंबापासून स्क्वॅश, सरबत, अनारदाना, पावडर

वाढत्या उष्णतेने नुकसान

यावर्षी तापमान ३९ अशांपासून ४३ अशांपर्यंत पोहोचले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी डाळिंब फळाला पेपरच्या सहाय्याने झाकले होते. तसेच अनेक भागांत झाडेही कागदाने झाकली होती. परंतु या वाढत्या तापमानामुळे आच्छादन करूनही काही फायदा झाला नाही. त्यामुळे डाळिंबावर काळे डाग पडले, दाणे काळपट झाले. वाढत्या उष्णतेमुळे डाळिंबाचे नुकसान झाले.

उत्पादन घटले

गतवर्षी कमी पाऊस, त्यामुळे भूजल पातळीत घट झाली. याचा परिणाम डाळिंब बहरावर झाला. त्यामुळे फळाचा आकार आणि वजन अपेक्षित वाढले नाही. यामुळे डाळिंबाचे उत्पादन २० टक्क्यांनी घटले. गतवर्षीच्या तुलनेत डाळिंबाच्या दरात वाढ झाली असली तरी, उत्पादन कमी असल्याने पिकासाठी घातलेला खर्च आणि मिळालेले उत्पन्न याचे गणित जेमतेम जुळले आहे.

यावर्षीचा हस्त बहर तसा चांगला गेला. पण पाणी कमी असल्याने उत्पादन कमी आहे. उष्णतेमुळे डाळिंबाचे नुकसान झाले आहे.
- प्रभाकर चांदणे, अध्यक्ष अखिल भारतीय डाळिंब, संघ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com