Pomegranate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Pomegranate Market : आंबिया बहरातील डाळिंबांची विक्री अंतिम टप्प्यात

Pomegranate Rate : राज्यात यंदा आंबिया बहरातील डाळिंब पीक निसर्गाच्या अवकृपेमुळे धोक्यात आले. परंतु गेल्या काही दिवसांपासून डाळिंबाला पोषक वातावरण असल्याने डाळिंबाचे नुकसान काहीअंशी टळले आहे.

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Sangli News : राज्यात यंदा आंबिया बहरातील डाळिंब पीक निसर्गाच्या अवकृपेमुळे धोक्यात आले. परंतु गेल्या काही दिवसांपासून डाळिंबाला पोषक वातावरण असल्याने डाळिंबाचे नुकसान काहीअंशी टळले आहे.

या बहरातील डाळिंबाची विक्री अंतिम टप्प्यात आली असून, डाळिंबाला गतवर्षीच्या तुलनेत सरासरी प्रति किलोस २० ते ३० रुपये अधिकचे दर मिळत आहेत. सद्यःस्थितीला दर्जेदार डाळिंबाला १५० ते १७५ रुपये प्रतिकिलो असा दर असून डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना दरामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.

राज्यात यंदाच्या हंगामात अंदाजे ३० ते ३५ हजार हेक्टरवर आंबिया बहर धरला. मात्र मे महिन्यात मॉन्सूनपूर्व पावसामुळे डाळिंबाचा बहर धोक्यात आला. या पावसामुळे डाळिंबावर तेलकट रोगासह कुजवा रोगाचाही प्रादुर्भाव झाला होता. त्यातच फुलकळ आणि सेटिंगच्याही अडचणी वाढल्याने उत्पादनात ५० टक्के घट होईल, असा अंदाज डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केला होता.

जून महिन्यात बदलत्या वातावरणाचाही फटका डाळिंबावर झाला. यंदा तेलकट रोगापेक्षा कुजवा रोगाचा प्रादुर्भाव अधिक असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. त्यातूनही शेतकऱ्यांनी काटेकोर व्यवस्थापन करत डाळिंब बागा चांगल्या साधल्या आहेत.

आंबिया बहरातील डाळिंबाची विक्री जूनपासून सुरू झाली आहे. हंगामाच्या प्रारंभापासूनच डाळिंबाला चांगले दर मिळू लागले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना काही अंशी दिलासा मिळाला आहे. परंतु निसर्गाच्या अवकृपेमुळे डाळिंबाचे नुकसान झाले असल्याने मिळालेला दर आणि उत्पादन खर्च याचा ताळमेळ घालताना शेतकऱ्यांना काही प्रमाणात कसरत करावी लागत असल्याचे चित्र आहे.

वास्तविक पाहता, दोन वर्षांपूर्वी आंबिया बहरातील दर्जेदार डाळिंबाला प्रति किलोस १३० ते १४० रुपये प्रति किलो असा दर होता. गतवर्षीही डाळिंबाच्या दरात १० ते २० रुपयांची वाढ झाली होती. अर्थात, गतवर्षी दर्जेदार डाळिंबाला १४० ते १६० रुपये असा दर होता. यंदा बजाज पेठेत डाळिंबाला मागणी असून उठाव होत आहे.

यामुळे दरही अपेक्षित मिळत आहेत. यंदाच्या हंगामात डाळिंबाला प्रति किलोस १५० ते १७५ रुपये असा दर मिळत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा डाळिंबाला सरासरी प्रति किलोस २० ते ३० रुपये अधिकचा दर मिळत आहे. वास्तविक पाहता, दोन नंबरच्या डाळिंबाला प्रति किलोस १०० ते १५० रुपये असा दर आहे.

यंदा प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांनी डाळिंब बागा साधल्या आहे. निसर्गाच्या बदलत्या वातावरणामुळे डाळिंबाचे उत्पादन काही प्रमाणात कमी झाले आहे. बाजारपेठेत डाळिंबाला मागणी असून उठाव होत असल्याने दरही चांगले आहेत.
- प्रभाकर चांदणे, अध्यक्ष, अखिल भारतीय डाळिंब संघ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing : मूग, उडीद, तुरीच्या पेरण क्षेत्रात घट

Costal Safety : काशीदला ‘बंधाऱ्या’चे सुरक्षा कवच

Pune Dams: पुणे जिल्ह्यातील धरणांत ८० टक्के पाणीसाठा

Dhamani Dam : धामणी धरणात सव्वा टीएमसी पाणीसाठा

Loan Waiver Promise: अजितदादांच्या सासुरवाडीतूनच कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT