Pomegranate
PomegranateAgrowon

Pomegranate Price: डाळिंबाच्या एका क्रेटला साडेसहा हजार रुपये दर

Alephata APMC Market: आळेफाटा बाजार समितीत बुधवारी (ता. ९) डाळिंबाच्या २० किलोच्या एका क्रेटला प्रतवारीनुसार सहा हजार ५०० रुपयांचा उच्चांकी बाजारभाव मिळाला आहे.
Published on

Pune News: आळेफाटा बाजार समितीत बुधवारी (ता. ९) डाळिंबाच्या २० किलोच्या एका क्रेटला प्रतवारीनुसार सहा हजार ५०० रुपयांचा उच्चांकी बाजारभाव मिळाला आहे. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीत असणाऱ्या उपबाजारात कांद्याप्रमाणे आता डाळिंबाचे दररोज लिलाव मोठ्या प्रमाणावर होऊ लागले आहे.

Pomegranate
Pomegranate Price: आळेफाटा उपबाजारात डाळिंबाला ७ हजार रुपये दर

यामध्ये एक नंबर डाळिंबास वीस किलोच्या एका क्रेटला प्रतवारीनुसार सहा हजार ५०० रुपयांचा भाव मिळाला आहे. त्या खालोखाल त्याच्या दोन नंबर डाळिंबाच्या एका क्रेटला चार हजार रुपयांचा बाजारभाव मिळाला आहे.

Pomegranate
Pomegranate Farming: डाळिंबाचा दर्जा, चकाकी योग्य राखण्यासाठी प्रयत्न

तर तीन नंबरच्या एका वीस किलोच्या क्रेटला दोन हजार ५०० रुपये बाजारभाव मिळाला तर चार नंबरच्या एका वीस किलोच्या क्रेटला १२०० रुपयांचा बाजारभाव मिळाला.तसेच बाजार समितीमध्ये चार हजार विक्रमी क्रेटची आवक झाली होती.

दरम्यान, आळेफाटा येथील या बाजार समितीत पारनेर, संगमनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, शिरूर, अहिल्यानगर या ठिकाणाहून शेतकरी डाळिंब विक्रीसाठी येत असल्याने त्यामुळे पुणे आणि नगर जिल्ह्यासाठी ही महत्त्वाची बाजार पेठ आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com