Pomegranate  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Pomegranate Rate : हस्त बहारमधील डाळिंबाचे दर दबावात

Pomegranate Market : राज्यातील हस्त बहारातील डाळिंबाची विक्री अंतिम टप्प्यात आली आहे. एप्रिलच्या मध्यापर्यंत विक्री पूर्ण होईल.

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Sangli News : राज्यातील हस्त बहारातील डाळिंबाची विक्री अंतिम टप्प्यात आली आहे. एप्रिलच्या मध्यापर्यंत विक्री पूर्ण होईल. मात्र, वाढत्या उन्हामुळे डाळिंबावर सनबर्निंगचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. त्यामुळे बाजारपेठेत डाळिंबाचा उठाव कमी झाल्याने दर्जेदार डाळिंबाच्या दरात प्रति किलोस पंधरा दिवसांत तब्बल ६० रुपयांनी घट झाली आहे. यामुळे डाळिंब उत्पादक हवालदिल झाला आहे.

राज्यात दरवर्षी हस्त बहारातील डाळिंबाचे क्षेत्र सुमारे ३० हजार हेक्टरवर जाते. मात्र, यंदा कमी पावसाचा फटका त्यास बसला. शेतकऱ्यांनी यंदाचा हस्त बहार पाण्याची उपलब्धता पाहूनच धरला. त्यामुळे १० हजार हेक्टरवर डाळिंबाच्या बागा शेतकऱ्यांनी साधल्या. या बहारातील डाळिंबाची विक्री जानेवारी महिन्यापासून सुरू होते.

डाळिंब खरेदी करण्यासाठी दक्षिण भारतातील व्यापारी दाखल झाले होते. जानेवारीत दर्जेदार डाळिंबाला १४० रुपये, दोन नंबरच्या डाळिंबाला १०० तर तीन नंबरच्या डाळिंबाला ७० रुपये प्रतिकिलो दर मिळाला. जानेवारीत डाळिंबाचे दर टिकून होते. फेब्रुवारीच्या सुरवातीला दरात प्रतिकिलोस २० ते ३० रुपयांनी घट झाली. फेब्रुवारीच्या मध्यावर पुन्हा डाळिंबाची आवक वाढली आणि मागणीही वाढली. त्यामुळे डाळिंबाच्या दरात तेजी आली.

दरम्यान, डाळिंब विक्रीचा हंगाम अंतिम टप्प्यात आला. राज्यात सुमारे ५ ते १० टक्के डाळिंबाची विक्री अजून बाकी आहे. त्यातच वाढत्या उष्णतेचा फटका डाळिंब पिकाला बसू लागला. डाळिंबावर सनबर्निंगचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने डाळिंबाचा दर्जा कमी झाला. त्यामुळे बाजारात डाळिंबाची मागणी कमी झाल्याने उठावही कमी होऊ लागला. याचा परिणाम दरावर झाला आहे.

मार्चच्या मध्यापासून डाळिंबाच्या दर प्रति किलोस ३० रुपयांपासून ते ८० रुपयांपर्यंत कमी झाले आहेत. सध्या दर्जेदार डाळिंबाला ८० तर दोन नंबरच्या डाळिंबाला ६० रुपये दर मिळत आहे. हस्त बहार एप्रिलच्या मध्यापर्यंत संपेल.

गेल्यावर्षीच्या तुलनेत दर बरा

गतवर्षी हस्त बहारातील डाळिंबाला चांगले दर होते. हंगामाच्या अंतिम टप्प्यात दर्जेदार डाळिंबाला ७० रुपये प्रतिकिलो दर मिळाला. परंतु यंदा हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात गतवर्षीच्या तुलनेत दर्जेदार डाळिंबाला १० रुपये प्रति किलोने दर अधिक आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या हंगामात डाळिंबाला तसे बरे दर आहेत.

हस्त बहारातील डाळिंबाची विक्री अंतिम टप्प्यात आली आहे. वाढत्या उन्हामुळे डाळिंबावर सनबर्गिंगचा प्रादुर्भाव वाढला आहे. डाळिंबाची मागणी कमी झाली आहे. त्यामुळे दर कमी झाले आहेत.
- प्रभाकर चांदणे, अध्यक्ष, अखिल भारतीय डाळिंब संघ.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PDKV Akola : शिवारफेरीतून अनुभवले फलोत्पादनातील तंत्रज्ञानशिवारफेरीतून अनुभवले फलोत्पादनातील तंत्रज्ञान

Swabhimani Us Parishad : पहिली उचल किती घ्यायची?; गाळप हंगाम सुरू होण्याआधी 'स्वाभिमानी'चा एल्गार, जयसिंगपुरातील ऊस परिषदेत ठरणार आंदोलनाची दिशा

Turmeric Farming : हळद पिकातील प्रमुख किडींचे नियंत्रण

Soil Conservation: आता तरी श्रीमंत करा माती!

National Agri Market: लेखाजोखा राष्ट्रीय बाजाराचा!

SCROLL FOR NEXT