Papaya Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Papaya Rate: खानदेशात पपई दर किलोला १६ ते १८ रुपये

Papaya Market: उत्तरेकडून मोठी मागणी असतानाच उत्पादन कमी दिसत असल्याने खानदेशात पपई दरात सुधारणा झाली आहे. जागेवर किंवा शिवार खरेदीत शेतकऱ्यांना १६ ते १८ रुपये प्रतिकिलो दर मिळत आहे.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News: उत्तरेकडून मोठी मागणी असतानाच उत्पादन कमी दिसत असल्याने खानदेशात पपई दरात सुधारणा झाली आहे. जागेवर किंवा शिवार खरेदीत शेतकऱ्यांना १६ ते १८ रुपये प्रतिकिलो दर मिळत आहे.

सध्या दर्जेदार पपई खानदेशात कमी उपलब्ध आहे. बाजारात पपईची आवक कमी झाली. उत्पादन हवे तसे नसताना कमी दर दिले जात असल्याचा मुद्दा नंदुरबार, धुळ्यात एप्रिल व मेमध्ये चर्चेत होता. पण आवक कमी राहिल्याने दराचा तिढा यंदा फारसा नव्हता. डिसेंबर व जानेवारीत पपईची मागणी होती.

तसेच दर जागेवर प्रति किलो १२ ते १४ रुपये एवढा त्या वेळेस मिळाला. पण दर एप्रिल व मेमध्ये कमी झाले. या कालावधीत अनेकांचे पीक संपुष्टात आले.

आता श्रावणमास व अन्य कारणांमुळे पपईला मागणी आहे. दुसरीकडे खानदेशात बाजारात पपईची आवक कमी आहे. सध्या रोज सात ते आठ ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) पपईची आवक होत आहे.

राज्यातील बाजारातही पपईची मागणी आहे. उत्तर भारतातूनही मागणी आहे. यामुळे पपई दरात किलोमागे दोन ते तीन रुपयांची सुधारणा झाली आहे. कमाल दर १८ रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचले आहेत. पपईची खरेदी सध्या पंजाब, हरियाना, काश्मीर, उत्तर प्रदेश, राजस्थान आदी भागांतील खरेदीदार खानदेशातील एजंटच्या मदतीने करीत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sudhir Munghantiwar: मुनगंटीवार यांनी विधिमंडळात उपस्थित केलेले शेतीचे प्रश्‍न ठरले लक्षवेधी 

Solar Pump Issues: सोलर पंपाच्या सक्तीने सिंचन अडचणीत

Wild Vegetable Festival: रानभाजी महोत्सवाला उत्स्फुर्त प्रतिसाद; आदिवासी उत्पादनांना ग्राहकांची पसंती

Nanded Rain: नांदेडला पावसामुळे खरिपाला जीवदान

Ujani Dam: ‘उजनी’तून भीमा नदीत सोडण्यात येणारा विसर्ग बंद

SCROLL FOR NEXT