Soybean Rate
Soybean Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Rate : सोयाबीन बाजाराला पामतेलाचा आधार

टीम ॲग्रोवन

पुणेः आंतरराष्ट्रीय बाजारात पामतेलाचे दर (Palm Oil Rate International Market) वाढल्याने सोयाबीनच्या दरालाही (Soybean Rate) आधार मिळत आहे. देशातही आज सोयाबीनच्या दरात (Domestic soybean Rate) क्विंटलमागे ५० ते १०० रुपयांची सुधारणा पाहायला मिळाली. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे दर (International Market Soybean Rate) काहीसे नरमले होते.

मागील काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात पामतेलाच्या दरात चढ-उतार होत आहेत. काल दर वाढल्यानंतर आज काहीशी घसरण झाली. त्यामुळे सोयाबीनचे दरही नरमले होते. काल सीबाॅटवर सोयाबीनच्या दराने १४ डाॅलर प्रतिबुशेल्सचा टप्पा पार केला होता. मात्र आज सोयाबीनचे दर पुन्हा कमी झाले. आज सोयाबीनचे व्यवहार १३.७७ डाॅलर प्रतिबुशेल्सने पार पडले. आंतरराष्ट्रीय बाजारात पामतेलाच्या दरातील चढउतारासह सोयातेल आणि सोयाबीनचे दरही कमीजास्त होताना सध्या दिसत आहेत.

ऑक्टोबरच्या पहिल्या २० दिवसांमध्ये विविध भागांमध्ये झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची दमछाक झाली. देशात मागील आठवड्यापासून पाऊस थांबला. त्यामुळे सोयाबीनच्या काढणीने वेग घेतला. काढणी सुरु झाल्यानंतर बाजारातील आवक खेडा खरेदीही वाढली. यंदा शेतकरी जागेवरच सोयाबीन विक्री करताना दिसत आहेत.

पावसात ओल्या झालेल्या सोयाबीनची गुणवत्ता कमी झाली. त्यातच त्याची टिकवणक्षमता कमी आहे. त्यामुळे सोयाबीनची लगेच विक्री करत असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं. हे सोयाबीन जास्त काळ ठेवल्यास बुरशी लागण्याची शक्यता आहे. तसंच सोयाबीन मागं ठेवलं तरी गुणवत्ता कमी असल्यानं जास्त दर मिळणार नाही. शिवाय नुकसान होईल ते वेगळं. त्यामुळं टिकवणक्षमता कमी असलेल्या सोयाबीनचा निपटारा शेतकरी लगेच करत आहेत.

परंतु या सोयाबीनसाठी शेतकऱ्यांना मिळणारा दरही काहीसा कमी आहे. सध्या बांधावरून खरेदी होणाऱ्या सोयाबीनला सरासरी ४ हजार ३०० ते ४ हजार ७०० रुपये क्विंटल दर मिळतोय. या सोयाबीनमध्ये आताही १४ ते १६ टक्क्यांपर्यंत ओलावा येत असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं.

मात्र दुसरीकडे एफएक्यू दर्जाच्या सोयाबीनच्या बाजारभावात सुधारणा झालेली दिसतेय. काल सोयाबीनचा सरासरी दर हा ४ हजार ९०० ते ५ हजार १०० रुपये होता. तर आज सोयाबीनच्या दरात क्विंटलमागे ५० ते १०० रुपयांची सुधारणा झाली होती. अनेक बाजारांमध्ये ५ हजार ते ५ हजार २०० रुपयांच्या दरम्यान सोयाबीनचे व्यवहार झाले. सोयाबीनचे दर या दरपातळीवर टिकून राहू शकतात. शेतकऱ्यांनी ५ हजार ते ६ हजार रुपयांची दरपातळी लक्षात ठेऊन टप्प्याटप्पयाने विक्री करावी, असं जाणकारांनी सांगितलं.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : सोमवारपासून पुन्हा पावसाचा अंदाज; राज्यातील बहुतांशी भागात ऊन आणि उकाडा वाढण्याची शक्यता

Kharif Planning Review Meeting : आठ लाख हेक्टरवर खरीप पेरण्यांचे नियोजन

Banana Farming Management : सिंचन, खत व्यवस्थापनावर भर

Kokan Development : कोकणातील आंबा पिकासाठी स्वतंत्र मंडळ स्थापणार

Indian Agriculture : शेतातील सेंद्रिय पदार्थाचे पुनर्चक्रीकरण

SCROLL FOR NEXT