Cotton Import  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Import : पाकिस्तान ठरला अमेरिकन कापसाचा सर्वांत मोठा आयातदार

Textile Industry Crisis : संततधार पावसामुळे खालावलेली कापसाची प्रत, त्याबरोबरच कमी झालेली उत्पादकता या कारणांमुळे पाकिस्तानातील वस्त्रोद्योग अडचणीत आला आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : संततधार पावसामुळे खालावलेली कापसाची प्रत, त्याबरोबरच कमी झालेली उत्पादकता या कारणांमुळे पाकिस्तानातील वस्त्रोद्योग अडचणीत आला आहे. गरज भागविण्यासाठी अमेरिकेतून कापूस आयातीवर भर देण्यात आला असून, जगातील इतर देशांच्या तुलनेत सर्वाधिक १.१९२ लाख गाठींची आयात आजवर करण्यात आली आहे.

अमेरिकन कृषी विभागाच्या एका अहवालानुसार, पाकिस्तानला आतापर्यंत सर्वाधिक १.२९२ लाख गाठींची (१६० किलोग्रॅम प्रत्येकी) निर्यात करण्यात आली आहे. अमेरिकन कापसाची आयात करणाऱ्या इतर देशांमध्ये दुसऱ्या स्थानी व्हिएतनाम व त्यानंतर तुर्की, स्वित्झर्लंड, मेक्‍सिको, चीन आणि भारत यांचा समावेश आहे.

वस्त्रोद्योगाची गरज भागविण्याकरिता यंदा पाकिस्तानकडून आयातीवर भर देण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात संयुक्‍त राज्य अमेरिका, ब्राझील तसेच अन्य देशांसोबत ३० ते ३५ लाख गाठींच्या आयातीसंदर्भातील करार करण्यात आले आहेत. त्यासोबतच इतर काही देशांमधूनही कापूस आयात कराराबाबत चर्चा सुरू असल्याचे सांगितले जाते.

देशांतर्गंत लागणाऱ्या कापसाची गरज भागविण्याच्या उद्देशाने या वर्षी ५.५ लाख गाठींच्या आयातीवर पाकिस्तानने भर दिला आहे. विशेष म्हणजे सरकारी धोरणामुळे पाकिस्तानातील जिनिंग व्यवसायांना टाळे लागले आहे. देशात सुमारे १२०० पेक्षा अधिक जिनिंग उद्योग असले, तरी त्यातील केवळ ४०० जिनिंग व्यवसाय कापसाच्या उपलब्धतेमुळे सुरू होते. त्याचा रोजगारावरही परिणाम झाला आहे.

१८ टक्‍के करामुळे रुईच्या आयातीवर भर

पाकिस्तान सरकारने रुईच्या विक्रीवर १८ टक्‍के कराचे धोरण अवलंबिले आहे. याउलट रुईची आयात करमुक्‍त आहे. त्यामुळेच जिनिंग व्यावसायिकांनी देशांतर्गत प्रक्रिया आणि विक्रीवर भर देण्याऐवजी आयातीसाठी पुढाकार घेतला आहे. हे देखील आयात वाढण्याचे एक कारण सांगितले जाते. याचा परिणाम पाकिस्तानमध्ये कापसाचे दर दबावात आले आहेत. त्याचा फटका त्या भागातील शेतकऱ्यांना बसला आहे. विशेष म्हणजे धागा आयात देखील करमुक्‍त करण्यात आली आहे.

...अशी आहे विविध देशांतील आयात (लाख गाठी)

पाकिस्तान : १.१९

व्हिएतनाम : ०.९६

तुर्की : ०.६७

स्वित्झर्लंड : ०.६५

मेक्‍सिको : ०.५९

चीन : ०.५२

भारत : ०.२५८

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Season 2024 : दामाजी, विठ्ठलराव शिंदे कारखान्यांचा वाहतूक खर्च कमी

Latur Voting Percentage : वाढलेल्या मताच्या टक्क्याचा कोणाला बसणार?

Nashik Assembly Voting : नाशिक जिल्ह्यात सरासरी ६७.९७ टक्के मतदान

Agriculture Irrigation : सिंचन योजनेतून शेतीसाठी २१ टीएमसी पाणी

GM Mustard : जीएमला परवानगी दिली तर तेलबिया उत्पादन वाढेल; जीएमला परवानगी देण्याची उद्योगांची मागणी

SCROLL FOR NEXT