Chhatrapati Sambhajinagar News: मराठवाड्यात सलग चौथ्या दिवशीही जोरदार पावसाची हजेरी सुरू आहे. सोमवारी (ता.१८) सकाळपर्यंतच्या २४ तासांत सहा जिल्ह्यांतील तब्बल ३८ मंडलांत अतिवृष्टी झाली. त्यामध्ये सर्वाधिक बीडमधील १४, परभणी ४, छत्रपती संभाजीनगर १, जालना ३, लातूर ११, नांदेड ५ मंडलांचा समावेश आहे. अनेक ठिकाणी पीक नुकसानीबरोबरच वित्तहानी झाल्याच्या घटना पुढे येत आहेत. .मराठवाड्यात सलग चौथ्या दिवशी अपवाद वगळता बहुतांश मंडलांत पावसाचा जोर कायम असल्याची स्थिती आहे. सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत लातूर जिल्ह्यात पावसाचा जोर सर्वाधिक राहिला. या जिल्ह्यात सरासरी ४९.९ मिलीमीटर पाऊस झाला. त्यापाठोपाठ नांदेड जिल्ह्यात ३७, जालना जिल्ह्यात ३५.९ मिलिमीटर, परभणीमध्ये ३५.५ बीडमध्ये ३४.९, हिंगोली जिल्ह्यात सरासरी २६.५ मिलीमीटर, छत्रपती संभाजीनगरमध्ये २०.६, तर धाराशिव जिल्ह्यात सरासरी १४.५ मिलिमीटर पाऊस झाला..Agriculture Crop Damage: अमरावती विभागात तीन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान.छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर तालुक्यात सरासरी ३२.५ मिलिमीटर, पैठणमध्ये ३५, गंगापूरमध्ये १५.६, वैजापूरमध्ये १०.५, कन्नडमध्ये १२.६, खुलताबादमध्ये ३६.४,सिल्लोडमध्ये ११.१, सोयगावमध्ये ५.६ तर फुलंब्री मध्ये सरासरी २३.२ मिलिमीटर पाऊस झाला. जिल्ह्यात सरासरी २०.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली..Heavy Rain: अतिवृष्टीने जनजीवन विस्कळीत.जालना जिल्ह्यात सरासरी ३५.९० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात झालेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारीनुसार जालना तालुक्यांत ३२ मिलीमीटर, बदनापूर ५३.४०,भोकरदन २५,जाफ्राबाद २९.७०, परतूर १२.१०, मंठा २१.७०,अंबड ५१.७०,घनसावंगी ४८.६० मिलीमीटर पावसाची नोंद झाली..जिल्ह्यात आजपर्यंत वार्षिक सरासरीच्या एकुण ७९.२१ टक्के एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. अति पावसामुळे पिके पाण्याखाली गेली असून अनेक ठिकाणी पिकांच्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज घेणे सुरू असल्याची माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.