Latur News : लातूर : जिल्ह्यात यंदा कापसाचे पीक जोमदार आले होते. मोठ्या उत्पादनाचा आशा असतानाच उशिरापर्यंत सुरू असलेला पाऊस व वातावरणातील बदलामुळे काही भागात उत्पादनावर परिणाम झाला. कापसाची बोंडे कमी लागली आहेत. यातच कापूस वेचणीसाठी मजूर मिळत नसल्याने पांढरे सोने संकटात सापडले आहे.
काही भागांत दोन ते तीन वेचणीतच कापसाचा खराटा होत असून दुसरीकडे कापसाचे भाव दहा वर्षांपासून साडेसहा ते सात हजार रुपये क्वटलच िं ्या दरम्यानच असल्याने कापूस उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. जिल्ह्यात अहमदपूर व जळकोट तालुक्यात मोठ्या प्रमाणात कापसाचे उत्पादन घेतले जाते.
यंदा चांगला पाऊस झाल्यामुळे कापसाचे पीक जोमदार आले. मात्र, काही भागांत पावसाचा चांगला तर काही भागांत पावसाचा विपरित परिणाम कापसावर झाला. पावसाबरोबरच वातावरणातील बदलाचाही फटका कापसाला बसला. काढणीसाठी आलेल्या पिकाला मजुरांचा तुटवडा भासत असून शेतकऱ्यांना एक क्वटल कापूस िं वेचणीसाठी हजार ते बाराशे रुपये मोजावे लागत आहेत.
विधानसभा निवडणूक प्रचारामुळेही मजुरांनी शेतीच्या कामाकडे पाठ फिरवली. यामुळे कापूस वेचणीला उशीर झाला व मजूर मिळत नसल्याने पांढऱ्या सोन्याची माती होण्याची भीती शेतकऱ्यांना वाटू लागली. वेचणीसाठी मजुरांकडून अडवणूक होत असतानाच दोन ते तीन वेचण्यांमध्येच कापसाची काढणी संपत आहे.
पाऊस व वातावरणातील बदलामुळे काही भागांत कापसाला मोठ्या प्रमाणात बोंडे लागली नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. उत्पादन खर्चात वाढ होऊन उत्पादनही घटल्याचा धक्का बसला असताना कापसाचे बाजारभाव यंदा सात हजारांच्या घरातच आहेत.
सरकारने कापसाच्या हमीभावात ५०१ रुपयांची वाढ केली असली तरी भारतीय कपास निगमने मध्यम धाग्याच्या कापसासाठी ७ हजार १२१ रुपये आणि लांब धाग्याच्या कापसासाठी ७ हजार ५२१ रुपये हमीभाव जाहीर केला आहे.
सोयाबीनसारखीच कापसाची गत
२०१३ मध्ये ला कापसाला बाजारात प्रतिक्विंटल साडेसात हजार रुपये भाव मिळत होता. सध्या सहा ते सात हजार रुपये प्रतिक्विंटल दराने कापूस खरेदी केला जात आहे. कापसाचे उत्पन्न यंदा चांगले असले तरी हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे.
सोयाबीनप्रमाणेच गेल्यावर्षी शेतकऱ्यांनी भाववाढीच्या आशेने कापसाची साठवणूक केली. मात्र, तातडीच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी शेतकऱ्यांना कापसाची विक्री करावी लागत आहे. सोयाबीनला पर्याय म्हणून शेतकरी कापूस लागवडीकडे वळले. मात्र, त्यांना अडचणींचा सामना करण्याची वेळ आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.