Paddy Procurement  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Paddy : सोळा लाख क्विंटलनी वाढली धान खरेदी मर्यादा

मर्यादित धान खरेदीमुळे शेतकऱ्यांसमोर शिल्लक धानाची विल्हेवाट लावण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे धान खरेदीची मर्यादा वाढवून देण्याची मागणी होत होती.

टीम ॲग्रोवन

गोंदिया : मर्यादित धान खरेदीमुळे (Paddy Procurement) शेतकऱ्यांसमोर शिल्लक धानाची विल्हेवाट लावण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे धान खरेदीची मर्यादा वाढवून देण्याची मागणी होत होती. खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा लावून धरला. त्यामुळे अखेरीस धान खरेदीची मर्यादा (Paddy Procurement Limit) १६ लाख क्विंटलने वाढवून देण्यात आली आहे.

केंद्र सरकारने यंदा रब्बी हंगामात राज्याला ३७२६ टन धान खरेदीची मर्यादा ठरवून दिली होती. मात्र राज्यातील रब्बीचे धान लागवड क्षेत्र आणि उत्पादनाच्या तुलनेत ही मर्यादा फारच कमी होती. त्यामुळे गोंदिया भंडारा-जिल्ह्यात जवळपास ३५ लाख क्विंटल धान शासकीय केंद्रावर खरेदी अभावी शेतकऱ्यांकडे शिल्लक राहिले. हमीभाव खरेदी बंद झाल्याने व्यापाऱ्यांनी कमी दराने धान खरेदी केली. त्यामुळे धान खरेदी मर्यादा वाढविण्याची मागणी होत होती.

गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील तब्बल दीड लाख शेतकरी अडचणीत आले होते. त्यामुळे पटेल यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन धान खरेदीची मर्यादा वाढवून देण्याची मागणी केली. आमदार मनोहर चंद्रिकापुरे, राजू कारेमोरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अविनाश काशीवार यांनी दिल्ली येथे अन्नपुरवठा विभागाकडे या संदर्भात पाठपुरावा केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर यांच्या नेतृत्वात स्थानिक पातळीवर तहसीलदार आणि जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. त्यामुळे केंद्र सरकारने धान खरेदीची मर्यादा वाढवून ४.१४ लाख क्विंटल केली आहे. त्यामुळे राज्याला जवळपास १६ लाख क्विंटल धान खरेदी करता येईल. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील ४० हजार शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Someshwar Sugar Factory Election: सोमेश्वरच्या कारभाऱ्यांचा आज होणार फैसला; मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष

Dimbhe Dam Water Leakage: डिंभे धरणातून होतेय पाण्याची गळ

Paddy Farmer Bonus: धान उत्पादकांना हेक्टरी २० हजार बोनस द्या : मुनगंटीवार

Mumbai APMC File Case: मुंबई राष्ट्रीय बाजार समितीत फाइल पळविल्याचा आरोप

Sugarcane Price: साडेपाच हजारांच्या ऊसदराचे गणित साखरेच्या भावावर अवलंबून

SCROLL FOR NEXT