Sitafal Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Organic Sitafal : मेळघाटातील सेंद्रिय सीताफळ बाजारात दाखल

Tribal Farmer : आता हा रानमेवा चिखलदरा, परतवाडा, अचलपूर व अन्य ठिकाणच्या बाजारपेठेत उपलब्ध झाला आहे. यापासून आदिवासी बांधवांना चांगला रोजगार मिळत आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Chikhaldara News : तालुक्यातील काही गावांसह मेळघाटच्या डोंगर रांगांमधील सीताफळांना रानमेवा म्हणूनही ओळखले जाते. आता हा रानमेवा चिखलदरा, परतवाडा, अचलपूर व अन्य ठिकाणच्या बाजारपेठेत उपलब्ध झाला आहे. यापासून आदिवासी बांधवांना चांगला रोजगार मिळत आहे.

महाराष्ट्रासह मध्य प्रदेशात या सीताफळांची मोठी मागणी असते. मात्र या वर्षी दुष्काळी परिस्थिती आणि कमी झालेला पाऊस, यामुळे उत्पादनात घट आली आहे. आवक कमी असल्याने सीताफळांना चांगला दर मिळत असल्याचे चित्र आहे.

मेळघाटच्या दुर्गम भागातील सीताफळांना चांगला दर मिळत असला तरी उत्पादन कमी आहे. त्यामुळे ‘कहीं खुशी, कही गम,’ अशी परिस्थिती आहे. चिखलदरा, अचलपूर, चांदूरबाजार तालुक्यांत, तसेच सीमावर्ती भागातील मध्य प्रदेशातील डोंगर रांगांमधील सीताफळांना राज्यात मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

अचलपूर तालुक्यातील पथ्रोट, परसापूर, वडगाव आणि चिखलदरा तालुक्यातील मेळघाटच्या पायथ्याशी असलेल्या जंगलात मोठ्या प्रमाणात सीताफळांची झाडे आढळून येतात. यातून आदिवासी बांधवांना रोजगार मिळत असतो. मात्र या वर्षी जिल्ह्यात झालेला असमाधानकारक पाऊस आणि दुष्काळी परिस्थितीमुळे सीताफळांच्या उत्पादनात प्रचंड घट झाल्याचे दिसून येत आहे.

त्यामुळे ग्राहकांना सीताफळांना जादा दर देऊन खरेदी करावे लागत आहे. आदिवासी बांधवांकडून सीताफळाच्या बियांचे संकलन करण्यात येत आहे. संकलित बिया आपापल्या शेताच्या बांधावर तसेच रस्त्याच्या कडेला लावून सीताफळाच्या झाडांचे संगोपन करण्यात येणार आहे, असे आदिवासी बांधवांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing : सातारा जिल्ह्यात खरीप पेरणी अंतिम टप्प्यात

Farmer Felicitation : ‘सीसीआरआय’च्या वर्धापन दिनी प्रयोगशील शेतकऱ्यांचा गौरव

Melghat Water Scarcity : मेळघाटच्या पाणीटंचाईला ब्रेक

Nanded Water Stock : नांदेडमधील पाणीसाठा ३१ दलघमीने वाढला

Automated Weather Station : सांगलीत स्वयंचलित हवामान केंद्रासाठी ६९६ गावांत चाचपणी

SCROLL FOR NEXT