Soybean  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

MSP Soybean Procurement : राज्यात हमीभावाने सोयाबीनची खरेदी फक्त १९ टक्के पूर्ण; खरेदीसाठी उरले फक्त १९ दिवस

Market Update : राज्यात सोयाबीन खरेदी केवळ नावापुरती सुरु असल्याचं स्पष्ट होत आहे. सरकारने यंदा १४ लाख १३ हजार टन खरेदीचे उद्दीष्ट ठेवले. मात्र आतापर्यंत केवळ २ लाख ६७ हजार टनांचीच खरेदी झाली.

Anil Jadhao 

Pune News : राज्यात सोयाबीन खरेदी केवळ नावापुरती सुरु असल्याचं स्पष्ट होत आहे. सरकारने यंदा १४ लाख १३ हजार टन खरेदीचे उद्दीष्ट ठेवले. मात्र आतापर्यंत केवळ २ लाख ६७ हजार टनांचीच खरेदी झाली. म्हणजेच एकूण उद्दीष्टाच्या केवळ १९ टक्के खरेदी झाली. राज्यात आता फक्त १९ दिवस सोयाबीनची खरेदी चालणार आहे. 

सोयाबीन उत्पादकांची नाराजी दूर करण्यासाठी खरेदी केंद्रे सुरु केली. मात्र या केंद्रांवर खरेदी धिम्या गतीने सुरु आहे. राज्यात सध्या ५८५ खरेदी केंद्रांना खरेदीची परवागी मिळाली आहे. त्यापैकी ५५८ खरेदी केंद्रे सुरु आहेत. नाफेडच्या ४०० आणि एनसीसीएफच्या १५८ केंद्रांवर सध्या सोयाबीनची खरेदी सुरु आहे. राज्यातील सोयाबीन पिकाचा विस्तार लक्षात घेता सध्या सुरु असलेली खरेदी केंद्रे खूपच कमी आहेत. शासनाने किमान एक हजारपेक्षा अधिक खरेदी केंद्रांना खरेदीची परवानगी देणे आवश्यक होते. 

नाफेड आणि एनसीसीएफच्या सुरु असलेल्या खरेदी केंद्रांवर सोयाबीन विक्रीसाठी ५ लाख २४ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. आतापर्यंत २ लाख ९४ हजार शेतकऱ्यांकडून खरेदीचे नियोजन करण्यात आले. तर १ लाख ३२ हजार शेतकऱ्यांकडून प्रत्यक्ष सोयाबीनची खरेदी झाली. नाफेडकडे तब्बल ४ लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. तर एनसीसीएफकडे १ लाख २३ हजार शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी केली. 

केंद्र सरकारने यंदा राज्यात १४ लाख १३ हजार टन सोयाबीन खरेदीचे उद्दीष्ट दिले होते. त्यापैकी पहिल्या टप्प्यात १० लाख टन खरेदीला राज्याने परवानगी दिली होती. १० लाख टन खरेदी झाल्यानंतर गरज भासल्यास त्यापुढी खरेदीला परवानगी दिली जाईल, असे राज्याने स्पष्ट केले होते. पण सध्याची खरेदीची गती पाहता पहिल्या टप्प्यातील १० लाख टन खरेदीचे उद्दीष्टही पूर्ण होणार नाही हे स्पष्ट दिसत आहे. यापैकी निम्मी खरेदी होईल की नाही, अशी शंकाही आता उपस्थित केली जात आहे. 

बाजारभाव मंदीतच

सरकारने यंदा सोयाबीनला ४ हजार ८९२ रुपये हमीभाव जाहीर केला. पण सध्या खुल्या बाजारात सोयाबीनला सरासरी ४ हजारांचाच भाव मिळत आहे. सरकारने हमीभावाने खरेदी जाहीर केल्यानंतर सरकारने उद्दीष्ट पूर्ण केल्यास खुल्या बाजारालाही आधार मिळेल, अशी शक्यता होती. पण सरकार निम्म उद्दीष्टही पूर्ण करणार नाही, हे चित्र दिसू लागल्यानंतर बाजारात सोयाबीनचा भाव आणखी कमी झाला. याचा फटका सोयाबीन उत्पादकांना बसत आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT