Agriculture Commodity Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Agriculture Commodity Market : हळद, मूग, कांदा, टोमॅटोच्या दरात घसरण

India Pakistan Conflict : भारत आणि पाकिस्तान यांच्यात वाढलेल्या तणावाचा परिणाम भारतातून होणाऱ्या शेतीमाल निर्यातीवर होत आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील व्यापार ठप्प झाला आहे.

डॉ.अरूण कुलकर्णी

फ्यूचर्स किमतीः सप्ताह- ३ ते ९ मे, २०२५

या सप्ताहात कापूस, हळद, मूग, कांदा व टोमॅटो यांचे भाव घसरले; इतर शेतीमालाचे भाव वाढले. कांद्याचे भाव रु. १,१३८ वर आले आहेत, तर टोमॅटो रु. १,००० पर्यंत घसरला आहे. हरभऱ्याचे भाव ३.४ टक्क्यांनी वाढले. अमेरिकेतील कापसाचे भाव १.५२ टक्क्यांनी वाढले, तर सोयाबीनचे भाव ०.४८ टक्क्यांनी घसरले.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात वाढलेल्या तणावाचा परिणाम भारतातून होणाऱ्या शेतीमाल निर्यातीवर होत आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील व्यापार ठप्प झाला आहे. तसेच भारतातून सोवियत युनियन आणि आखाती देशांना पाकिस्तानमार्गे होणारी निर्यात थांबवण्यात आली आहे. त्यामुळे आता ही निर्यात लांब पल्ल्याच्या पर्यायी मार्गाने करावी लागणार असल्याने वाहतुकीचा वेळ आणि खर्च वाढणार आहे.

खरीप पिकासाठी पुढील वर्षासाठीचे हमीभाव या महिन्याअखेर जाहीर होण्याची शक्यता आहे. मॉन्सून यंदा केरळमध्ये नेहमीपेक्षा पाच दिवस आधी दाखल होण्याचा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवला आहे. देशात यंदा सरासरीच्या १०५ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला असून महाराष्ट्रात चांगल्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. आगामी खरीप हंगामाच्या दृष्टीने ही बाब महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

९ मे २०२५ रोजी संपलेल्या सप्ताहात किमतींमधील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत.

कापूस/कपाशी ः

MCX मधील कापसाचे स्पॉट भाव (राजकोट, यवतमाळ, जालना) या सप्ताहात ०.५ टक्क्यांनी घसरून रु. ५४,४०० वर आले आहेत. जुलै फ्युचर्स भाव रु. ५६,००० वर स्थिर आहेत. सप्टेंबर भाव रु. ५७,५०० वर आलेले आहेत. ते स्पॉट भावापेक्षा ५.६ टक्क्यांनी अधिक आहेत. अमेरिकेतील कापसाचे भाव या सप्ताहात १.५२ टक्क्यांनी वाढले.

NCDEX मधील कपाशीचे स्पॉट भाव (राजकोट, प्रति २० किलो, २९ मिमी) गेल्या सप्ताहात रु. १,४८२ वर आले होते. या सप्ताहात ते रु. १,४८५ वर आले आहेत. नोव्हेंबर फ्यूचर्स ३.७ टक्क्यांनी घसरून रु. १,४८१ वर आले आहेत. ते स्पॉट भावापेक्षा ३.७ टक्क्यांनी कमी आहेत. फेब्रुवारी फ्यूचर्स रु. १,५६५ वर आले आहेत.

कापसाचे हमीभाव मध्यम धाग्यासाठी प्रति क्विंटल रु. ७,१२१ व लांब धाग्यासाठी रु. ७,५२१ आहेत.

मका ः

NCDEX मधील खरीप मक्याच्या स्पॉट किमती (गुलाबबाग) गेल्या सप्ताहात ७.२ टक्क्यांनी घसरून रु. २,२०० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या वाढून रु. २,२५० वर आल्या आहेत. जून फ्युचर्स किमती १.१ टक्क्याने वाढून रु. २,२६७ वर आल्या आहेत. जुलै फ्यूचर्स रु. २,२७९ वर आहेत. स्पॉटपेक्षा हा भाव १.९ टक्क्यांनी अधिक आहे. सध्याचे फ्यूचर्स भाव हमीभावापेक्षा (रु. २,२२५) कमी आहेत.

हळद ः

NCDEX मधील हळदीच्या स्पॉट किमती (निजामाबाद, सांगली) गेल्या सप्ताहात १.८ टक्क्याने घसरून रु. १४,६१६ वर आल्या होत्या. या सप्ताहातसुद्धा त्या १.९ टक्क्यांनी घसरून रु. १४,३३७ वर आल्या आहेत. जून फ्यूचर्स किमती रु. १३,६२४ वर आल्या आहेत. ऑगस्ट किमती रु. १३,५३८ वर आल्या आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या ५.६ टक्क्यांनी कमी आहेत. सांगलीमधील (राजापुरी) स्पॉट भाव ३.४ टक्क्यांनी घसरून रु. १५,५०० वर आला आहे.

हरभरा ः

हरभऱ्याच्या स्पॉट किमती (अकोला) गेल्या सप्ताहात २.५ टक्क्यांनी घसरून रु. ५,८५० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ३.४ टक्क्यांनी वाढून रु. ६,०५० वर आल्या आहेत. हरभऱ्याचा

हमीभाव रु. ५,६५० आहे. आवक वाढती आहे.

मूग ः

मुगाची स्पॉट किंमत (मेरटा) रु. ७,६५० वर आली आहे. मुगाचा हमीभाव रु. ८,६८२ जाहीर झाला आहे; मुगाचा हंगाम आता संपला आहे.

सोयाबीन ः

गेल्या सप्ताहात सोयाबीनची स्पॉट किंमत (अकोला) ०.६ टक्क्याने घसरून रु. ४,४४४ वर आली होती. या सप्ताहात ती १.१ टक्क्याने वाढून रु. ४,४९५ वर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ४,८९२ आहे. नवीन पिकाची आवक आता कमी होऊ लागली आहे. हमीभावापेक्षा बाजार भाव कमी आहे. अमेरिकेतील सोयाबीनचे भाव या सप्ताहात ०.४८ टक्क्यांनी घसरले.

तूर ः

गेल्या सप्ताहात तुरीची स्पॉट किंमत (अकोला) रु. ७,०३३ वर आली होती. या सप्ताहात ती वाढून रु. ७,३८४ वर आली आहे. तुरीचा हमीभाव रु. ७,५५० आहे. आवक कमी होऊ लागली आहे.

कांदा ः

कांद्याची किंमत (पिंपळगाव) या सप्ताहात ४.४ टक्क्यांनी घसरून रु. १,१३८ वर आली आहे. कांद्याची आवक वाढत आहे.

टोमॅटो ः

गेल्या सप्ताहात टोमॅटोची स्पॉट किंमत (जुन्नर, नारायणगाव) रु. १,१०० वर आली होती; या सप्ताहात ती रु. १,००० वर आली आहे.

(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति खंडी (३५५.५६ किलो); कपाशीची किंमत प्रति २० किलो.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Scheme: लाडकी बहीण योजनेत २ हजार १०० रुपये हप्त्याची प्रतीक्षा कायम; मुख्यमंत्र्यांचे तोंडी आश्वासन

Poultry Feed in Summer: उन्हाळ्यात कोंबड्यांचा आहार कसा असावा?

Onion Market: पंधरा हजार ट्रक कांदा विकून ११८ कोटी

Karnataka Agriculture Budget: शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी ‘मुख्यमंत्री कृषी विस्तार’ योजना, कर्नाटक अर्थसंकल्पात घोषणा

Chana Procurment : हरभरा हमीभावासाठी ई-समृद्धीवर नोंदणी कशी करावी?

SCROLL FOR NEXT