Onion Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Onion Market : नगर जिल्ह्यात कांदादर ३१०० ते ३२०० रुपयांवर स्थिर

Onion Rate : नगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून काही प्रमाणात कांद्याच्या दरात सुधारणा होताना दिसत आहे.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagar News : नगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांदा दरात काहीशी सुधारणा झाली आहे. नगरमधील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीसह जिल्हाभरातील अन्य बाजार समित्यांत कांद्याला ३१०० ते ३२०० रुपयांचा दर मिळत आहे.

नगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून काही प्रमाणात कांद्याच्या दरात सुधारणा होताना दिसत आहे. नगर येथील दादा पाटील शेळके बाजार समितीत शनिवारी (ता. २९) ६२९१५ कांदा गोण्यांची आवक झाली. यामध्ये एक नंबर कांद्याला सर्वाधिक ३१५० रुपयांचा भाव मिळाला. प्रतवारीनुसार एक नंबर कांद्याला किमान २५५० व कमाल ३१५०, दोन नंबर कांद्याला किमान १८५० तर कमाल २५५०, तीन नंबर कांद्याला किमान १००० तर कमाल १८५०, चार नंबर कांद्याला किमान ५०० तर कमाल एक हजाराचा भाव मिळाला.

राहाता येथील बाजार समितीत शुक्रवारी (ता. २८) कांद्याचे लिलाव झाले. एकूण १०७५१ कांदा गोण्यांची आवक झाली. एक नंबर कांद्याला २५०० ते ३२००, दोन नंबर कांद्याला १८५० ते २४५०, तीन नंबर कांद्याला ११०० ते १८००, गोल्टी कांद्याला २१०० ते २४००, जोड कांद्याला ५०० ते १००० रुपयांचा भाव मिळाला. राहुरी बाजार समितीत शुक्रवारी (ता. २८) कांद्याचे लिलाव झाले. एकूण ३७३८८ कांदा गोण्यांची आवक झाली.

यामध्ये एक नंबर कांद्याला सर्वाधिक २९०० रुपयांचा भाव मिळाला. तालुक्यातून कांद्याची आवक चांगली झाली. प्रतवारीनुसार एक नंबर कांद्याला २३०५ ते २९००, दोन नंबर कांद्याला १५०५ ते २३००, तीन नंबर कांद्याला २०० ते १५००, गोल्टीला १५०० ते २५०० रुपयांचा भाव मिळाला. तर वांबोरी उपबाजार समितीत शनिवारी (ता. २९) कांद्याचे लिलाव झाले. यामध्ये एक नंबर कांद्याला सर्वाधिक ३१०० रुपयांचा भाव मिळाला.

राहुरी तालुक्यासह शेजारील तालुक्यांतून एकूण ८४८९ कांदा गोण्यांची आवक झाली. श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान उपबाजार समितीत मोकळा कांदा लिलावात १६ वाहनांची आवक झाली. कांद्याला सर्वाधिक २८६० रुपये भाव मिळाला.

एक नंबर कांद्याला २४५० ते २८६० रुपये, दोन नंबर कांद्याला १८५० ते २४०० रुपये, तीन नंबर कांद्याला १२०० ते १८०० रुपये, तर गोल्टी कांद्याला १९०० ते २५०० रुपये भाव मिळाला. पारनेर, येथील बाजार समितीत शुक्रवारी (ता. २८) १०८५८ गोण्यांची आवक झाली. एक नंबर कांद्याला २७०० ते २९००, दोन नंबर कांद्याला २४०० ते २६००, तीन नंबर कांद्याला १६०० ते २३००, चार नंबर कांद्याला १००० ते १५०० रुपयांचा दर मिळाला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Vidhansabha Result 2024 : लाडकी बहिण योजनेचा महायुतीला फायदा; सोयाबीन दराचा मुद्दा ठरला 'फेल'?

Maharashtra Assembly Election : कोल्हापूर जिल्ह्यातील डझनभर कारखानदारांचे भवितव्य ठरणार, पहिल्या ३ तासांचा काय सांगतो कल

Farmers Exploitation : कोणा सांगाव्या शेतकऱ्यांच्या व्यथा

Maharashtra Election Result : शरद पवार पश्चिम महाराष्ट्राचा गड राखणार; सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपला चांगला आघाडी

Seed Certification System : बीज प्रमाणीकरण यंत्रणा करा गतिमान

SCROLL FOR NEXT