Onion Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Onion Market : बफर स्टॉकमधील कांद्याची २५ रुपये प्रतिकिलोप्रमाणे होणार विक्री

Onion Rate : देशभर कांद्याच्या किरकोळ दरात वाढ झाल्याने केंद्र सरकारने भाव स्थिरीकरण योजनेअंतर्गत खरेदी केलेला कांदा साठा विक्रीस आणण्याचा निर्णय शुक्रवारी (ता. २७) घेतला.

Team Agrowon

Nashik News : मागणीच्या तुलनेत कांद्याची अवाक कमी झाल्याने सध्या बाजारात दरात सुधारणा झाली आहे. देशभर कांद्याच्या किरकोळ दरात वाढ झाल्याने केंद्र सरकारने भाव स्थिरीकरण योजनेअंतर्गत खरेदी केलेला कांदा साठा विक्रीस आणण्याचा निर्णय शुक्रवारी (ता. २७) घेतला. ग्राहकांना दिलासा देण्यासाठी प्रतिकिलो २५ रुपये या सवलतीच्या दराने विक्री करणार असल्याची केंद्र सरकारच्या ग्राहक कल्याण मंत्रालयाच्या वतीने देण्यात आली आहे.

केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात ३ लाख टन खरेदी केला होता. ऑगस्ट महिन्यात दरात सुधारणा होताच केंद्र सरकारने ४० टक्के निर्यात शुल्क लागू केल्याने शेतकरी व कांदा व्यापारी-निर्यातदार यांच्यामध्ये असंतोष होता. त्यावेळी केंद्र सरकारने पुन्हा २ लाख साठा खरेदीस मान्यता दिली होती.

ही खरेदी नॅशनल कन्झ्युमर को-ऑपरेटिव्ह फेडरेशन ऑफ इंडिया आणि नॅशनल अॅग्रिकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या (नाफेड) यांच्या माध्यमातून २ लाख टन कांदा किरकोळ बाजारात आणणार आहे. हा कांदा २५ रुपये प्रतिकिलो दराने राज्याबाहेर सवलतीच्या दराने विकला जाणार आहे.

भाव स्थिरीकरण योजनेंतर्गत खरेदी केलेल्या कांद्याची ऑगस्ट महिन्यापासून विक्री व पुरवठ्याला सुरुवात झाली होती. मात्र शेतकरी हिताचा कांगावा होत असताना आता पुन्हा दरवाढ झाल्यानंतर पुन्हा कांदा २५ रुपये प्रतिकिलो दराने कांदा विक्री केला जाणार आहे.

मात्र उन्हाळ कांद्याचा साठा संपुष्टात येत आहे. त्यातच नवीन खरीप कांदा अजून एक महिन्यानंतर बाजारात येण्याची चिन्हे आहेत. परिणामी, डिसेंबरपर्यंत कांद्याचे दर वाढतच राहण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT