Milk Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Milk Rate : ‘गोकुळ’कडून म्हशीच्या दूध खरेदीदरात दीड रुपया वाढ

Gokul Milk Rate : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकुळ) म्हशीच्या दूध खरेदीदरात दीड रुपयाची वाढ केली आहे.

Team Agrowon

Kolhapur News : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकुळ) म्हशीच्या दूध खरेदीदरात दीड रुपयाची वाढ केली आहे. गायीच्या दूध खरेदीदरात मात्र दोन रुपयांनी कपात करण्यात आली आहे, अशी माहिती संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी दिली.

म्हशीच्या दुधास (५.५ फॅट ते ६.४ फॅट व ९.० एसएनएफ प्रतीच्या दुधास) प्रतिलिटर एक रुपया वाढ केली आहे. तसेच ६.५ फॅट व ९.० एसएनएफ प्रतीच्या पुढील दुधास प्रतिलिटर १ रुपये ५० पैसे वाढ केली आहे.

खरेदीदर ६.० फॅट व ९.० एसएनएफ साठी प्रतिलिटर रुपये ४९.५० वरून ५०.५० रुपये करण्यात आला आहे. तसेच ६.५ फॅट व ९.० एसएनएफसाठी प्रतिलिटर ५१.३० वरून ५२.८० रुपये दर करण्यात आला आहे.

दूध उत्पादकांच्या गायीच्या दूध खरेदीदरात २ रुपये कपात करण्यात आली आहे. राज्यात खासगी व इतर दूध संघांचे गायीच्या दुधाचे खरेदी दर कमी झाले आहेत.

बाजारपेठेतील दूध पावडर, बटर, लोणी यांचे दर कमी झाले आहेत. या सर्व बाबींचा विचार करून गाय दूध खरेदी दर कमी केल्याचे संघाच्या वतीने सांगण्यात आले. गाय दुधामध्‍ये ३.५ फॅट व ८.५ एसएनएफसाठी प्रतिलिटर गायीचा दूध खरेदी दर ३५.०० वरून ३३.०० रुपये करण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Crushing Season: शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदतीची शासनाची भूमिका

Sugarcane Crushing Season: एकरी शंभर टन ऊस उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवा

Hasan Mushrif: शेतकरी कर्जबाजारीच होऊ नये यासाठी उपाययोजना करा : मंत्री हसन मुश्रीफ

Agri Stack: भरपाईसाठी ई-केवायसी रद्द, पण ‘फार्मर आयडी’ अनिवार्य

Farm Roads: अहिल्यानगरमधील शेत, शिव,पाणंद रस्त्यासाठी विशेष मोहीम

SCROLL FOR NEXT